Pakistan Economic Crisis Latest Update SAAM TV
देश विदेश

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान कंगाल झालाय? गॅस सिलिंडर १०००० रुपयांना, पैशांची चणचण

पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. एलपीजी गॅस प्लास्टिकच्या पिशवीत आणला जात आहे. पाकिस्तानवर ही वेळ का आलीय?

Nandkumar Joshi

Pakistan Economic Crisis Latest Update : भारताचा शेजारी देश श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती पुरती ढासळली आहे. सोन्याची लंका कशी कंगाल होत चाललीय, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अशीच परिस्थिती आणखी एक शेजारी देश पाकिस्तानवर ओढवलीय.

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये बाजारपेठा, लग्नाचे हॉल बंद करण्याची वेळ आलीय. इतकेच नाही तर एलपीजी गॅस प्लास्टिकच्या पिशवीत आणला जात आहे. पाकिस्तानवर ही वेळ का आलीय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

श्रीलंका हा चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आणि आर्थिक संकटात सापडला. दुसरीकडे, पाकिस्तानही कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. तर फॉरेक्स रिझर्व्ह्समध्ये (परकीय चलन साठा) घट होत चालली आहे.

'डॉन'च्या रिपोर्टनुसार, मार्च २०२२ पर्यंत पाकिस्तानवरील कर्ज एकूण ४३ लाख कोटी झालं होतं. यातील सर्वाधिक कर्ज इम्रान खान यांच्या कार्यकाळात वाढले. त्यांनी तीन वर्षांत देशातील जनतेवर जवळपास १४०० कोटींच्या कर्जाचं ओझं टाकलं. सध्याची परिस्थिती बघता पाकिस्तानी आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे दिसून येते.

परकीय चलन साठ्यात घट

पाकिस्तानमधील परकीय चलन साठा गेल्या महिन्यात २९४ मिलियन डॉलरपर्यंत घटून ५.८ अब्ज डॉलर झाला आहे. कर्जाच्या परतफेडीमुळं ही घट होत आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेच्याही परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने होत असलेल्या घटीमुळे तो देश आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून आले आहे.

याशिवाय आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील जुलै-ऑक्टोबरच्या तिमाहीत पाकिस्तानची वित्तीय तूट जीडीपीच्या १.५ टक्के राहिला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ ख्वाजा यांनीही पाकिस्तान गंभीर आर्थिक परिस्थितीतून जात असल्याचे म्हटले आहे.

सरकारी तिजोरीत बचत करण्याची धडपड

पीटीआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने पैशांची बचत करण्यासाठी आणि देशाच्या सरकारी तिजोरीवरील वाढता बोजा कमी करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनतेला मुलभूत सुविधा पुरवतानाही नाकीनऊ येत आहेत.

आर्थिक बोजा कमी करण्यासाठी वीज वाचवण्याची मोहीम तीव्र केली आहे. वर्क फ्रॉम होम धोरण अवलंबून सरकारी कार्यालयांतील वीजेचा वापर कमी केला जात आहे.

प्लास्टिक पिशवीत एलपीजी गॅस

पाकिस्तानच्या बिकट आर्थिक स्थिती ही आणखी एका क्षेत्रातून स्पष्टपणे दिसून येत आहे. येथील नागरिकांना प्लास्टिकच्या फुग्यांमधून स्वयंपाकाचा गॅस आणावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा प्रांतातील रहिवासी प्लास्टिकच्या पिशव्यांमधून गॅस आणताना दिसून आले आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर १० हजार रुपयांना मिळत आहे.

कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नाहीत

पाकिस्तान सरकारकडे आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नसल्याचे समोर आले आहे. रेल्वे विभागाची सर्वात वाइट अवस्था आहे. गेल्या वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना ग्रॅच्युएटी देण्यासाठी पैसे नाहीत.

रेल्वे विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेतनाचे पैसेही दिलेले नाहीत. कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला खात्यात जमा केले जात होते. मात्र, आता २० दिवस उशिराने वेतन मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT