Pakistan Division News: 12 To 15 New Provinces Proposed? Asim Munir Plan saam tv
देश विदेश

देशाचे पुन्हा एकदा विभाजन होणार! ४ प्रांत मोडणार, १५ नवे राज्य होणार? पाकिस्तानात नेमकं काय शिजतंय?

Restructure Pakistan Map : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या एका नव्या प्रस्तावामुळे देशात खळबळ माजलीय. पाकिस्तानच्या चार प्रांतांची पुनर्रचना करून १२ ते १५ नवे प्रांत निर्माण करण्याच्या चर्चेला वेग आला आहे.

Bharat Jadhav

  • पाकिस्तानचे चार प्रांत मोडून १२ ते १५ नवे प्रांत होणार का?

  • आसिम मुनीर यांचा पाकिस्तानच्या विभाजनाचा कथित प्लॅन काय?

  • पाकिस्तानमध्ये नवीन प्रांत निर्माण करण्याचा प्रस्ताव काय आहे?

सध्या पाकिस्तानात प्रशासकीय बदलांबाबत मोठी चर्चा सुरूय. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर हे देशाचं पुन्हा एकदा विभाजन करणार आहेत. देशातील सध्याच्या चार प्रांतांचे विभाजन करून १२ ते १५ लहान राज्य निर्माण करण्याचा त्याचा प्रस्ताव आहे. या योजनेचा घोषित उद्देश प्रशासन सुधारणे आणि सरकारी सेवा सर्वसामान्यांसाठी अधिक सहज उपलब्ध करून देणे हा आहे.

मात्र या प्रस्तावामुळे काही राजकीय प्रश्नही उपस्थित झालेत. लहान प्रांत निर्माण करण्याच्या नावाखाली लष्कर आणि केंद्र सरकार आपली पकड अधिक घट्ट करू शकतात, तर दुसरीकडे विरोधी पक्षांचा राजकीय प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमध्ये १२ ते १५ नवीन प्रांत निर्माण करण्याची तयारी

पाकिस्तानच्या सध्याच्या चारही प्रांतांची स्वतःची वेगळी राजकीय ओळख आणि भक्कम प्रादेशिक आधार आहे. यासह पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या प्रांतांमधील राजकीय गतिशीलता एकमेकांपासून बऱ्याच अंशी भिन्न आहे. अशा परिस्थितीत, या प्रांतांचे विभाजन केल्यास त्याचा देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याचा अंदाज आहे.

पंजाब:

पाकिस्तानमधील सर्वात मोठे प्रांत असलेल्या पंजाबची लोकसंख्या सुमारे १२८ दशलक्ष (१२.८ कोटी) आहे. येथे नवाझ शरीफ यांच्या कुटुंबाचा पक्ष असलेल्या 'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ' (PML-N) चा मोठा राजकीय प्रभाव असल्याचं सांगितलं जातं.

सिंध:

या प्रांतात भुट्टो-झरदारी कुटुंबाशी संबंधित 'पाकिस्तान पीपल्स पार्टी' (PPP) चे वर्चस्व आहे. देशाचे प्रमुख व्यापारी केंद्र असलेले कराची शहरही याच प्रांतात स्थित आहे.

खैबर पख्तुनख्वा:

हा प्रदेश माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष, 'पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ' (PTI) याचा बालेकिल्ला आहे.

बलुचिस्तान:

हा प्रांत दीर्घकाळापासून फुटीरतावादी हिंसाचार, राजकीय असंतोष आणि केंद्र सरकारसोबतच्या तणावाचा सामना करत आहे.

अशा परिस्थितीत या मोठ्या प्रांतांचे लहान घटकांमध्ये विभाजन केल्यास विद्यमान राजकीय पक्षांच्या प्रभावावर परिणाम होऊ शकतो. नवीन प्रांतांच्या निर्मितीमुळे स्वतंत्र सरकारे आणि प्रशासकीय घटक अस्तित्वात येतील, ज्यामुळे केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान अद्याप या योजनेचा कोणताही अधिकृत आराखडा जाहीर करण्यात आलेला नाहीये. मात्र राजकीय वर्तुळात याबाबत चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: आज कोणाला मिळणार यश, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

पवारांच्या गोविंदबागेत AIचा चमत्कार; एकरी 120 टन उसाचं उत्पादन

फेअरनेस क्रीमचा किडनीला धोका? गोरं होणं जीव घेणं! गायकाचा गंभीर आरोप

चीनच्या आता थेट चंद्रावर खाणी? 'चांग-ए' रोबोटिक मोहिमेनं खळबळ

बिसलेरीच्या पाण्यामुळे कॅन्सरचा धोका? कोर्टात खटला चालवण्यास FSSAIची मंजुरी

SCROLL FOR NEXT