Pakistan Bomb Blast saam tv
देश विदेश

पोलिस चौकीवर भीषण बॉम्बस्फोट; 11 जणांचा मृत्यू, 30 जखमी

Pakistan Dera Ismail Khan Police Checkpoint Bomb Blast 11 Killed: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माईल खान येथे पोलिस चौकीला लक्ष्य करत बॉम्बस्फोट करण्यात आला. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू असून सुमारे 30 जण जखमी झाले आहेत.

Omkar Sonawane

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये डेरा इस्माईल खान जिल्ह्यात शनिवारी मोठा बॉम्बब्लास्ट झाला. रस्त्यावरील पोलिस चौकीला लक्ष्य करत स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यात किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अर्थात TTP या संघटनेने स्वीकारली आहे. TTP ही अफगाण तालिबानपासून वेगळी संघटना असली तरी दोन्ही संघटनांमध्ये संबंध असल्याचे सूत्र सांगतात.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. TTP तसेच बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या संघटनांकडून अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! देशातील दोन बँकांचं होणार विलीनीकरण; RBI नं दिली मंजुरी

Saturday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 3 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा शनिवारचे राशीभविष्य

टाटा पॉवरचं पाणी दुष्काळग्रस्तांना द्या! वीज निर्मिती थांबवावी, सरकारनं तूट भरून काढावी

लवकरच टेस्लाची हवेत उडणारी कार, ताशी 97 किमी वेगानं उडणार कार

Fact Check: लाडकींना केंद्राकडून महिन्याला 5 हजार? केंद्र सरकारची गाव की बेटी योजना?

SCROLL FOR NEXT