Girl Killed 13 People Of Family In Pakistan  Saam tv
देश विदेश

Crime News: प्रियकरासाठी तरुणीने अख्खं कुटुंबच संपवलं, १३ जणांचा घेतला जीव; नेमकं प्रकरण काय?

Girl Killed 13 People Of Family In Pakistan : पाकिस्तानमध्ये एका तरुणीने प्रेमाखातर आपलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. आवडत्या तरुणासोबत लग्न करण्यास नकार दिल्यामुले तरुणीने हे टोकाचे पाऊल उचललं.

Priya More

प्रेमासाठी कोण कुठल्या थराराला जाईल हे सांगता येत नाही. पाकिस्तानमध्ये एका तरूणीने आपल्या प्रियकरांसाठी अख्खं कुटुंबं संपवलं. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ही धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीने कुटुंबातील १३ जणांचा जीव घेतला. याप्रकरणी तरुणीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानमध्ये एका तरुणीने प्रेमाखातर आपलं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला आवडणाऱ्या तरुणासोबत लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचललं. खैरपूरजवळील हैबत खान ब्रोही गावात १९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. आपल्या आवडीच्या तरुणासोबत लग्न करून देण्यास कुटुंबीयांनी नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने जेवणामधून विष देऊन संपूर्ण कुटुंबाला संपवलं.

कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यानंतर तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने कुटुंबाला संपवण्यासाठी कट रचला. खैरपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी इनायत शाह यांनी सांगितले की, 'तरुणीने जेवणामधून आपल्या कुटुंबीयांना विष दिले. जेवणल्यानंतर तरुणीच्या कुटुंपातील सर्व १३ सदस्य आजारी पडले. त्यांची प्रकृती खूपच बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. पोस्टमॉर्टम केले असता विषारी अन्नामुळे या सर्वांचा मृत्यू झाल्याचे कारण समोर आले.

या घटनेनंतर पोलिसांनी चौकशीसाठी तरुणाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तरुणी आणि तिच्या प्रियकराने घरात चपाती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गव्हात विष मिसळल्याचे निष्पन्न झाले. या तरुणीने देखील प्रियकराच्या मदतीने गव्हात विष मिसळल्याचे कबूल केले.

गेल्या वर्षी जून महिन्यात पाकिस्तानमधून असाच एक प्रकार समोर आला होता. ज्यामध्ये खैबर पख्तुनख्वा प्रांतात लग्नाच्या वादातून नातेवाईकांनी एकाच कुटुंबातील ९ जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. ही घटना मलाकंद जिल्ह्यातील बटखेला तहसीलमध्ये घडली आणि तीन महिला आणि सहा पुरुषांसह एका कुटुंबातील नऊ सदस्यांना नातेवाईकांनी झोपेत असताना गोळ्या घातल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkuwa News : प्रसूतीसाठी झोळीत टाकून पायपीट; रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे अशक्य, माघारी फिरत घरीच प्रसूती

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

SCROLL FOR NEXT