Saamana Editorial: मोदींनी विष पेरले, ते उगवले; राहुल गांधींवरील हिंसक वक्तव्यांना छुपा पाठिंबा? 'सामना'तून टीकेचा बाण
Uddhav Thackeray On India Aghadi PMSaam TV

Saamana Editorial: मोदींनी विष पेरले, ते उगवले; राहुल गांधींवरील हिंसक वक्तव्यांना छुपा पाठिंबा? 'सामना'तून टीकेचा बाण

Saamana Editorial On BJP Threating Rahul Gandhi: 'फेक नरेटिव्ह' निर्माण करण्याच्या कारखान्याचे मालक मोदी, शहा व फडणवीस असे लोक आहेत व त्यांनी गांधी हे आरक्षणविरोधी असल्याचा प्रचार सुरू केला," अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.
Published on

Saamana Editorial On Rahul Gandhi: काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील एका विधानावरुन सध्या देशभरात वाद सुरु आहे. राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याबाबत भाष्य केले असा दावा करत विरोधकांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. अशातच सत्ताधारी पक्ष तसेच घटक पक्षातील काही नेत्यांनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधाने केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ छाटण्याची भाषा किंवा अनिल बोंडे यांच्या चटके देण्याच्या वक्तव्यावरुन मविआचे नेते आक्रमक झाले आहेत. यावरुनच ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शहांवर टीका करण्यात आली असून राहुल गांधींवर हल्ल्याचे कटकारस्थान रचणाऱ्यांना मोदी- शहांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

Saamana Editorial: मोदींनी विष पेरले, ते उगवले; राहुल गांधींवरील हिंसक वक्तव्यांना छुपा पाठिंबा? 'सामना'तून टीकेचा बाण
Maharashtra Politics : महाविकास आघाडीचं ठरलं, स्ट्राईक रेटवर अडलं? काँग्रेसचा फॉर्म्युला ठाकरे-पवार स्वीकारणार का? पाहा व्हिडिओ

काय आहे सामना अग्रलेख?

"विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत भाजपसह त्यांच्या गोतावळ्याने केलेली विधाने भयंकर आहेत. पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षात जे विष पेरले ते कसे उगवले आहे याचे चित्र मागच्या काही दिवसात दिसले. आरक्षणासंदर्भात गांधी यांनी परदेशात केलेले विधान भाजपवाल्यांनी देशात मोडून तोडून समोर आणले. गांधी हे देशातील आरक्षण संपवायला निघाले आहेत व आम्ही ते होऊ देणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. 'फेक नरेटिव्ह' निर्माण करण्याच्या कारखान्याचे मालक मोदी, शहा व फडणवीस असे लोक आहेत व त्यांनी गांधी हे आरक्षणविरोधी असल्याचा प्रचार सुरू केला," अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.

मोदी सरकारला सळो की पळो केले...

"राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देऊ, अशी भाषा शिंदे गटाच्या एका आमदाराने केली, तर भाजपचे एक 'बोंडे' खासदार सांगतात, जीभ कापण्याची गरज नाही. जिभेला चटके देऊ. त्याच वेळी दिल्लीतील भाजपचे एक आमदार धमकी देतात की, राहुल यांची अवस्था त्यांच्या आजी इंदिरा गांधींसारखी करू. ही धमकी म्हणजे गांधी यांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार आहे. भाजपचे मानसिक संतुलन कोलमडले आहे व वरपासून खालच्या स्तरापर्यंत या कोलमडलेल्या मनाची प्रचीती लोकांना रोज येत आहे. सरकारच्या खोट्या व चुकीच्या गोष्टींची गय न करता त्यांनी मोदी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे चिडलेला भाजप त्यांची जीभ कापणार असेल तर या देशात इदी अमिनशाही सुरू आहे हे मान्य करावे लागेल," असा टोलाही यावेळी लगावण्यात आला.

Saamana Editorial: मोदींनी विष पेरले, ते उगवले; राहुल गांधींवरील हिंसक वक्तव्यांना छुपा पाठिंबा? 'सामना'तून टीकेचा बाण
Pune crime : पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल; शिक्षक पतीला राग अनावर, बिहारी मित्राच्या मदतीने त्याचा काटा काढला!

मोदी- शहांचा छुपा पाठिंबा...

दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याची भाषा भाजपचे पुढारी व त्यांच्या गोतावळ्यातील लोक करतात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा त्यावर बोलायला तयार नाहीत. म्हणजे या हिंसक वक्तव्यांना व गांधींवरील हल्ल्याचे कारस्थान रचणाऱ्यांना मोदी-शहांचा छुपा पाठिंबा आहे असे समजायचे काय? महाराष्ट्रात राहुल गांधींवर हिंसक हल्ल्याची भाषा होते. गांधींवर हल्ला करणाऱ्यांना इनाम देण्याची घोषणा करणाऱ्यांना गृहमंत्री फडणवीस संरक्षण देत असतील तर या राज्यात विरोधी पक्ष सुरक्षित नाही. मोदी यांनी विष पेरले, ते उगवले आहे, अशा शब्दात सामनामधून केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

Saamana Editorial: मोदींनी विष पेरले, ते उगवले; राहुल गांधींवरील हिंसक वक्तव्यांना छुपा पाठिंबा? 'सामना'तून टीकेचा बाण
Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com