Crime  Saam Digital
देश विदेश

Pakistan Crime News : बसमधील प्रवाशांवर धडाधड झाडल्या गोळ्या; २३ जणांचा मृत्यू, पाकिस्तानातील खळबळजनक घटना

Pakistan firing News : पाकिस्तानमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बलूचिस्तानमध्ये शस्त्रधारांनी बसमधील प्रवाशांचे ओळखपत्र पाहून बसमधील प्रवाशांवर गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बलूचिस्तानमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये सोमवारी २३ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शस्त्रधारी लोकांनी ट्रक आणि बस थांबवल्या. त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना सर्वांना खाली उतरवलं. त्यानंतर त्यांचे ओळखपत्र तपासून गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील मुशाखैलच्या राराशाम जिल्ह्यातील ही घटना आहे. शस्त्रधारी उग्रवाद्यांनी महामार्गावरील वाहनांना थांबवलं. त्यानंतर त्यांनी बसमधील प्रवाशांना खाली उतरवलं. या मृतांमध्ये पंजाबमधील लोकांचा समावेश आहे. बलूचमधील लोकांचं म्हणणं आहे की, 'पंजाबमधील लोक संसाधनावर कब्जा करत आहेत'. त्यामुळे बलूचमधील उग्रवादी पंजाबमधील लोकांवर हल्ला करू लागले आहेत.

या घटनेनंतर पाकिस्तानी पोलीस घटनास्थळी पोहोचली. या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करणे सुरु आहे. बलिचिस्तानचे मुख्यमंत्री ससरफराज बुगत यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त केली आहे. पंजाबमधील लोकांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, या घटनेची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे. या घटनेत ५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितनुसार, उग्रवाद्यांनी महामार्गावर काही वाहनांना आग लावली.

बलूचमधील उग्रवाद्यांचा पंजाबींवर राग का?

याआधी एप्रिल महिन्यातही आग लागल्याची घटना घडली होती. पंजाब प्रांतात राहणाऱ्या ९ युवकांना बलूचिस्तान प्रांतातील शस्त्रधाऱ्यांनी पंजाबच्या प्रवाशांना बसमधून उतरवून त्यांची हत्या केली होती. पाकिस्तानमधील पख्तून, बलूच आणि मुहाजिरो या भागातील उग्रवाद्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरु आहे. यामुळे या भागातील उग्रवाद्यांकडून सर्वसामान्यांवर हल्ला करतात. पाकिस्तानची सीमा ही बलूचमधील उग्रवाद्यांना मान्य नाही. ते आमच्या संसाधानावर कब्जा करत असल्याचा दावा बलूचमधील उग्रवाद्यांचा दावा आहे. त्यामुळे बलूचमधील उग्रवादी पंजाबमधील लोकांवर हल्ला करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vivah 2024: तुळशीचं लग्न कधी आहे? या दिवशी कशी केली जाते पुजा? पाहा मुहूर्त आणि महत्त्व

Zodiac Sign: गोड बोलून काम करून घेण्यात हुशार असतात या ४ राशींच्या व्यक्ती

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर KKR कडून खेळणार? मुंबईसह हे 2 संघ लावू शकतात मोठी बोली

Maharashtra New DGP : संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Car Driving Tips: कार चावलताना वारंवार झोप येतेय? तर 'या' टिप्स ट्राय करा....

SCROLL FOR NEXT