wedding ceremony, pakistan bans wedding ceremony late night, islamabad, power crisis
wedding ceremony, pakistan bans wedding ceremony late night, islamabad, power crisis saam tv
देश विदेश

सरकारचा माेठा निर्णय; रात्री दहा नंतर लग्न समारंभास बंदी; साडे आठला बाजारपेठ राहणार बंद?

Siddharth Latkar

पाकिस्तान : पाकिस्तान (pakistan) येथील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर शाहबाज सरकारने रात्री दहा नंतर लग्न समारंभांवर (wedding ceremony) बंदी घातली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीस बुधवारपासून (ता. आठ जून) इस्लामाबाद (Islamabad) येथे झाली. स्थानिक माध्यमांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार ही बंदी लागू केल्याचे म्हटले आहे. (government of pakistan has ban wedding ceremony after 10 pm due to shortage of electricity)

पाकिस्तानमधील आर्थिक संकटानंतर आता तेथे वीज संकटही गडद झाले आहे. पाकिस्तानने विजेचा वापर कमी करण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. रात्री दहा नंतर लग्न समारंभाच्या बंदीनंतर भविष्यात रात्री साडे आठ नंतर देशभरातील बाजारपेठा बंद ठेवण्याचा देखील निर्णय हाेऊ शकताे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी माध्यमांना माहिती देताना बाजार लवकर बंद करणे आणि घरातून काम केल्याने विजेची बचत होऊ शकते असे नमूद केले. ते म्हणाले देशात वीज निर्मिती 22,000 मेगावॅट आहे आणि गरज 26,000 मेगावॅटची आहे. त्यामुळे चार हजार मेगावॅटची कमतरता भासत आहे. वीजचे संकट दूर करण्यासाठी काही कठाेर निर्णय घ्यावे लागताहेत असेही मंत्री दस्तगीर यांनी द डेली टाईम्सशी बाेलताना देखील नमूद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT