helicopter crash in pakistan  representative image
देश विदेश

भारताच्या शेजारी देशात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; सर्वच जण जागीच ठार

helicopter crash in pakistan : भारताच्या शेजारी देशात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्वच जण जागीच ठार झाले आहेत.

Vishal Gangurde

पाकिस्तानात लष्काराचं हेलिकॉप्टर कोसळलं

हेलिकॉप्टरमधील सर्व जणांचा मृत्यू

हेलिकॉप्टर कोसळल्याने पाकिस्तानात खळबळ

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधून मोठी बातमी हाती आली आहे. पाकिस्तानच्या लष्काराचं हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या हेलिकॉप्टरमधील सर्व जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आहे. या दुर्घटेनेतील मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे .

पाकिस्तानचं 'डॉन' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सैन्य दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाडानंतर मुजफ्फराबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात मोठी दुर्घटना घडली. या हेलिकॉप्टरमधील सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती दिली. या दुर्घटनेत एकही जण बचावलेला नाही. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटना झाल्याचे सैन्य दलाने स्पष्ट केलं आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृतांचा अधिकृत आकडा हाती आलेला नाही.

ही दुर्घटना पीओकेच्या नीलम व्हॅलीमध्ये ही घटना घडली आहे. या हॅलिकॉप्टरमधील सर्व २१ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ISPR ने हेलिकॉप्टरमध्ये २० सैनिक आणि पायलट असल्याचे सांगितले. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आगे. दोन दिवसांपूर्वी बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; शेकडो नाराज शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रातील जवान काश्मीरमध्ये शहीद

Monsoon Destination : पाऊस, बोटिंग अन् निसर्गाचा मोहक नजारा, पाहा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले 'हे' सुंदर सरोवर

Shocking: लंडनमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू, ३६ व्या मजल्यावरून खाली पडले; हत्या की आत्महत्या?

cockroach janata party : 'कॉकरोच' पार्टी देशभरात कुठं-कुठं आंदोलन करणार? अभिजीत दीपकेनं शहरांची नावं केली जाहीर, पुण्यातून सुरुवात

SCROLL FOR NEXT