Accident News: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या काही तासांतच भारतीय वंशाच्या एका तरुण पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. डेल्टा एअर लाइन्समध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कार्यरत असलेला 26 वर्षीय डेव्ह फिजी आपल्या नव्या नवरीसह हनिमूनसाठी निघाला असताना हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे फिजी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केरळमधील मूळ वंश असलेल्या डेव्ह फिजीने शुक्रवारी त्याची मैत्रीण जेसनी हिच्याशी विवाह केला होता. डॉसनविलमधील ‘द रिव्हियर’ येथे पार पडलेल्या या विवाहसोहळ्यास सुमारे 400 पाहुणे उपस्थित होते. लग्नानंतर नवदाम्पत्यासाठी खास निरोप समारंभ म्हणून हेलिकॉप्टरमधून प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती.
लग्नाचा समारंभ संपल्यानंतर हे जोडपे रॉबिन्सन R66 हेलिकॉप्टरमधून डेकाल्ब-पीचट्री विमानतळाकडे रवाना झाले. त्यानंतर अटलांटा शहरातील एका हॉटेलमध्ये हनिमूनसाठी जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, हेलिकॉप्टरचा अटलांटामध्ये पोहोचण्याआधीच डॉसन काउंटीतील माउंट व्हर्नन ड्राइव्ह परिसरातील दुर्गम जंगलात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात डेव्ह फिजी आणि हेलिकॉप्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. हेलिकॉप्टर चालकाची ओळख अद्याप झालेली नाही. तर जेसनी या अपघातातून बचावली असून तिच्यावर मेट्रो अटलांटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डेव्हचे वडील जॉर्ज फिजी यांनी सांगितले की, अपघातानंतर बचाव पथकाला हेलिकॉप्टर शोधण्यासाठी बराच वेळ लागला. जेसनी जवळपास सहा तास ढिगाऱ्यात अडकून पडली होती. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी डेव्हला आपल्या जवळ पाहिले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे तिला लगेच समजले. जॉर्ज फिजी यांच्या मते, डेव्हला उड्डाणापूर्वी खराब हवामानाची चिंता होती. स्वतः अनुभवी वैमानिक असल्याने त्याने हेलिकॉप्टर चालकाला याबाबत सूचना देखील दिली होती. दरम्यान, अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) ने या दुर्घटनेचा तपास सुरू केला असून हेलिकॉप्टर कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.