Pahalgam Terror Attack Saam tv
देश विदेश

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ पर्यटकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Pahalgam Terror Attack update : जम्मू-काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ पर्यटकांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

Vishal Gangurde

जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केल्याची घटना घडली आहे. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती दिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या गटावर गोळीबार केला. पहलगामच्या एका डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांवर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील दोन जण मृत्यूमुखी पडले आहेत. काही जखमी देखील आहेत. तेथील प्रशासन त्यांना मदत करत आहे. आम्ही देखील मदत करत आहोत. अशा प्रकारच्या शक्तीचा नायनाट केल्याशिवाय भारत थांबणार नाही. असा मला विश्वास आहे'.

अकोल्यातील पर्यटक सुखरुप

अकोल्यातूनही काही पर्यटक काश्मीरच्या पहलगाममध्ये येथे गेले होते. अकोल्याचे १६ पर्यटक सुखरुप आहेत. अकोल्यातील गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून 16 पर्यटकांसह 30 पर्यटक पहलगामला जाणार होते. मात्र, पहलगाम पोहोचण्यापूर्वीच हल्ला झाल्याने पर्यटकांना थांबवण्यात आलं. अकोल्यातील सर्व पर्यटक सोनमर्ग मार्गे श्रीनगरमध्ये पोहोचले आहेत. सर्व पर्यटक सुखरूप असल्याची नातेवाईकांनी माहिती दिली आहे.

दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील कर्वेनगरमधील दाम्पत्य जखमी झालं आहे. पहलगाममध्ये पुण्यातील पाच जणांचं कुटुंब फिरायला गेले होते. त्यातील दोन पुरुषांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. पुण्यातील कुटुंबात दोन पुरुष आणि तीन महिला आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT