kashmiri boy carried a tourists small baby Saam Tv News
देश विदेश

Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार, मागे महिलेचा किंचाळण्याचा आवाज; काश्मीरी मुलानं तान्ह्या बाळाला वाचवलं, अंगावर काटा आणणारा VIDEO

Pahalgam Terror Attack : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा चिमुकल्या बाळाला घेऊन चालत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये गोळीबार होत असल्याचा आवाज येतोय.

Prashant Patil

जम्मू-काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील लोकांमध्ये संतापाची लाट आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा नाहक बळी गेला. या हल्ल्याच्या जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारताने देखील पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून पहलगाम हल्ल्यानंतर काही कठोर निर्णय घेतले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यादरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पहलगाममधील स्थानिक नागरिक पर्यटकांना मदत करत असल्याचं दिसून आलं. आता असाच एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलाने चिमुकल्याचा जीव वाचवल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा चिमुकल्या बाळाला घेऊन चालत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये गोळीबार होत असल्याचा आवाज येतोय. तर एक महिलेचा किंचाळल्याचा आवाज ऐकू येतंय. तसेच व्हिडीओमध्ये दिसणारा काश्मीरी मुलगा मी येतोय, असं महिलेला बोलताना दिसत आहे. व्हिडीओवर पहलगाम काश्मीर असं लिहिलं आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या मुलाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

दरम्यान, पु्ण्यातील मावळच्या देहूरोड मधून रमेशचंद्र यांचे कुटुंब काश्मीरच्या पहेलगाव मध्ये सहलीसाठी गेलं होतं. तिथे आपल्या मुलीचा व्हिडिओ काढत असताना दोन दहशतवादी त्या व्हिडिओत कैद झालेले आहेत. त्यानंतर त्यांची सहल आटोपल्यानंतर ते घरी आले. नंतर दोन दिवसांनी हल्ला झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, व्हिडिओत दिसणारे हेच ते आतंकवादी आहेत, जे रेकी करत होते.

'साम टिव्ही'चे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी रमेशचंद्र यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले की, '१८ एप्रिल २०२५ला आम्ही पहलगाममध्ये सहलीला गेलो होतो. पहलगामहून साडेसात किलोमीटवर बेताब व्हॅली म्हणून आहे, आणि आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. तिथे आम्ही आमच्या सहा वर्षीय मुलीचा रिल्स बनवत होतो. आम्ही बनवलेल्या रिलमध्ये ते दोन माणसं कैद झाले होते. आम्ही श्रीनगरमध्ये होतो तेव्हा आम्हाला माहिती झालं की, २२ तारखेला तिथे गोळीबार झाला. श्रीनगरहून आम्ही जम्मूला आलो आणि तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर सिक्युरिटी फोर्सेसने चार दहशतवाद्यांचा फोटो जारी केला'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT