Pahalgam Attack 
देश विदेश

Pahalgam Attack: 'जाओ मोदी को बता देना'; पत्नीच्या समोरच मंजूनाथ यांच्यावर गोळ्या झाडल्या गोळ्या

Pahalgam Attack: पहलगाममधील हल्ल्यात नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर कर्नाटकमधील मंजूनाथच्या पत्नीला दहशतवादी काय म्हणाला? या प्रकरणात दहशतवाद्याने मोदींचं नाव का घेतलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

मंजूनाथची पत्नी पल्लवीच्या चेहऱ्यावरचा आनंद काही क्षणातच दुःखात बदलला आणि त्याला कारण ठरलंय काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी मंजूनाथच्या डोक्याची अक्षरशः केलेली चाळण. दहशतवाद्यांनी पतीची हत्या केल्यानंतर पत्नीला म्हटलं, जाओ मोदी को बता देना. मात्र गोळीबारावेळी काय घडलंय? त्याची आपबितीच मंजूनाथची पत्नी पल्लवीने सांगितलीय

मंजूनाथ कुटुंबासोबत काश्मीर सहलीला गेले

पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड पॉईंटला पोहचले

अवघ्या 5 मिनिटातच आर्मीच्या कपड्यातील 4 दहशतवाद्यांकडून गोळीबार

त्याने माझ्या नवऱ्याला नाव विचारलं, नाव सांगताच हिंदू आहे असं म्हणत गोळ्या झाडल्या

नवऱ्याचा मृतदेह पाहून मला पण मारा, असं म्हणाले

त्यातील एक दहशतवादी बोलला तुला नाही मारणार, तू जा आणि मोदीला सांग

एवढंच नाही तर या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या आणखी एका महिलेचा आक्रोश समोर आलाय. नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्थानिकांनी आपल्याला वाचवल्याचं पल्लवी सागंते. त्यामुळे धर्म विचारुन हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविषयी देशभर संताप व्यक्त केला जातोय. हिंदूच नाही तर काश्मीरमध्ये मुस्लीमही या हैवानी कृत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी मोहीम कधी उघडणार? याकडे लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT