Pahalgam Attack: आयुष्याची अखेरची सहल; बायको आणि मुलांसमोरच दहशतवाद्यांनी ३ मावस भावांना संपवलं

Pahalgam Terrorist Killed Three Brothers: काश्मीरची सहल डोंबिवलीच्या 3 मावसभावांसाठी अखेरची ठरलीय. बायको आणि मुलांसमोरच दहशतवाद्यांनी या तिघांसोबत किळसवाणं कृत्य केलं. नेमकं काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
Pahalgam Attack:
Pahalgam Terrorist Killed Three Brothers
Published On

हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने हे डोंबिवलीतील तिघं मावसभाऊ. उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी कुटुंबासोबत मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगामला गेले. मात्र ही काश्मीर सहल त्यांच्या आयुष्यातली अखरेची सहल ठरलीय. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बायको आणि मुलांसमोरच या तिघांची हत्या कऱण्यात आलीय. त्यामुळे त्यांचं कुटुंब आणि मित्र परिवारावर आभाळ कोसळलंय.

एवढंच नाही तर तिघा मावसभावांसोबत दहशतवाद्यांनी केलेलं किळसवाणं कृत्यं माणुसकीला काळीमा फासणारं आहे. वर्षभराचा ताण हलका व्हावा, थोडं रिलॅक्स वाटावं म्हणून तिघं मावसभाऊ कुटुंबासोबत सहलीला गेले. मात्र चौथ्या दिवशी डोंबिवलीत परतली ती त्यांची निर्जिव शरीर आणि कुटंबांसाठी आयुष्यभराचं दु:ख.

कुणाच्या डोळ्यात आयुष्यभराची साथ देणाऱ्या पतीला कायमचं मुकल्यांच दु:ख, कुणाच्या डोळ्यात डोक्यावरची सावली हिरावल्याचं दु:ख .कुणीतरी धर्माध दहशतवादी निरपराधांवर गोळ्या झाडतो आणि असहाय्य हतबल कुटुंब निव्वळ अश्रू ढाळत रहातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com