Pakistan Finance Minister Muhammad Aurangzeb Saam Tv
देश विदेश

Pakistan: कंगाल पाकिस्तानने चीनपुढे हात पसरले, १.४ बिलियन डॉलर कर्ज मागितले

Pakistan Finance Minister Muhammad Aurangzeb: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर कंगाल पाकिस्तानने चीनपुढे हात पसरत कर्ज मागितले.

Priya More

Jammu Kashmir Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत देखील सज्ज झाला आहे. भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पाऊलं उचलली. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले, सिंधू जल करार रद्द केला त्याचसोबत अनेक महत्वपूर्ण निर्णय भारताने घेतले. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला.

भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कंबर कसल्यानंतर पाकिस्तान हादरून गेला आहे. पाकिस्तानने आपल्या मित्र देशांकडे मदत मागण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानने चीनकडे १.४ बिलियन डॉलरटी मागणी केली आहे. पाकिस्तानने चीनकडे कर्ज मागितल्याची माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी दिली.

शनिवारी वॉशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक गटाच्या बैठकींनंतर रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी सांगितले की, 'पाकिस्तानकडे आधीच ३० अब्ज युआनची स्वॅप लाइन आहे. आमच्या दृष्टिकोनातून, ४० अब्ज रॅन्मिन्बीपर्यंत पोहोचणे ही एक चांगली दिशा असेल.'

आम्ही चीनकडे मदत मागितीली आहे. त्यांच्याकडे आम्ही कर्जाबाबत विनंती केली आहे. चीनची मध्यवर्ती बँक अर्जेंटिना आणि श्रीलंका सारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसह चलन स्वॅप लाईन्सला प्रोत्साहन देत आहे. पाकिस्तानने आपला पहिला पांडा बाँड जारी करण्यातही प्रगती केली आहे. पांडा बाँड म्हणजे चीनच्या देशांतर्गत बाँड बाजारात जारी केलेले कर्ज आहे. पाकिस्तानने चीनला त्यांची सध्याची स्वॅप लाइन १० अब्ज युआनपर्यंत वाढवण्याचे आवाहन केल्याची माहिती औरंगजेब यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT