Katachi Amti Recipe: होळीला पुरणपोळीसोबत करा स्वादिष्ट कटाची आमटी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

उरलेले पुरणाचे पाणी (कट) 2 कप, चिंचेचा कोळ 1 टेबलस्पून, गुळ 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, गोडा मसाला 1 टीस्पून, हळद चिमूटभर, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, तेल, मीठ चवीनुसार.

Holi Special Katachi Amti Recipe | Saam Tv

कट तयार ठेवा

पुरण बनवताना चणाडाळ शिजवून गाळलेले पाणी म्हणजे ‘कट’. हेच कटाची आमटीसाठी बेस असते.

Katachi Amti Recipe

फोडणी द्या

कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका. चांगली फोडणी झाल्यावर हळद घाला.

Katachi Amti Recipe

मसाले मिसळा

आता त्यात लाल तिखट, गोडा मसाला घालून हलके परता. लगेच कट (डाळीचे पाणी) ओता.

Katachi Amti Recipe

आंबट-गोड चव आणा

चिंचेचा कोळ आणि गुळ घालून चव संतुलित करा. मीठ घालून सर्व मिश्रण उकळू द्या.

Katachi Amti Recipe

उकळी येऊ द्या

आमटीला किमान 8-10 मिनिटे मंद आचेवर उकळी येऊ द्या. यामुळे मसाल्यांचा स्वाद छान मिसळतो.

Katachi Amti Recipe

सर्व्हिंग

शेवटी कोथिंबीर घालून गरमागरम कटाची आमटी भात किंवा पुरणपोळी सोबत सर्व्ह करा.

Katachi amti

Chandra Grahan: ३ मार्चला ग्रहणात पारंपरिक समजुतीनुसार कोणत्या गोष्टी करणे टाळाव्यात?

chandra grahan
येथे क्लिक करा