लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरी याने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली
सैफुल्लाह कसूरीला मीडिया आणि सुरक्षा सूत्रे पहलागाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडपैकी एक म्हणून ओळखतात.
या घडामोडींनंतर भारताने आतंकवादविरोधी कारवाया व ऑपरेशन्सवर कारवाई सुरुवात केलीय.
पहलागाम हल्याच्या मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीनं भारताला धमकी देलीय. जम्मू-काश्मीरातील पहलगाम पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांची हत्या केली. त्याच्या बदला घेण्यासाठी भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. या ऑपरेशनच्या अंतर्गत भारत सरकारने सिंधू नदीचं पाणी रोखलंय.
आता लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरी याने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिलीय. भारत सरकारने कान उघडून ऐकावं. तसेच आपल्या क्रूर समाजालाही सांगावं की, ती वेळ येणार जेव्हा या नद्यासह धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर आमचा असेल. आज जे काही घडत आहे, त्याचा बदला घेतला जाईल. आम्ही आमच्या जीवावर खेळू आणि आमच्या देशाच्या प्रत्येक भागाचे रक्षण करू. आम्ही आपल्या वतन-ए-अजीजच्या इंचा-इंचाचे संरक्षण करू. अशी धमकी सैफुल्लाह कसूरी ने दिलीय.
दरम्यान कसूरीच्या धमक्यांनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. देशातील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सर्व संभाव्य पावले उचलली जात आहेत. भारत दहशतवादाविरोधात आणखी कठोर कारवाई करत आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना रोखल्या जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.