BJP MP Warn To Pakistan saam tv
देश विदेश

Pahalgam Attack: पाकिस्तानचे ४ तुकडे होणार; २०२५ नंतर जगाच्या नकाशावरून होणार गायब, भाजप खासदाराचा दावा

BJP MP Warn To Pakistan: शेजारी राष्ट्र जगाच्या नकाशावरून गायब होईल. त्या देशाचे चार तुकडे होतील. २०२५ नंतर पाकिस्तान नावाचा देश या पृथ्वीवरून नाहीसा होईल असा दावा भाजप खासदारने केलाय.

Bharat Jadhav

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात आक्रमक भुमिका घेतलीय. सरकारने पाकिस्तानसोबत अनेक करार रद्द केली आहेत. याचदरम्यान भाजप खासदाराने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तान देश जगाच्या नकाशावरून गायब होईल. वर्ष २०२५ नंतर पाकिस्तान दिसणार नाही, असा दावा केलाय.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी दुमका-देवघर लाइनवर देवघर आणि मोहनपूर रेल्वे स्टेशनदरम्यान महेशमारा हॉल्टचा शिलान्यास केला. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला गर्भित इशारा दिलाय. शिलान्यास करताना दुबे म्हणाले, ही मोदींची गॅरंटी आहे, तुम्ही विश्वास ठेवा, मोदी जे पण म्हणतात ते होतं असतं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी बोलताना ते म्हणाले, ज्याप्रकारे हिंदू लोकांना निवडून मारण्यात आल. त्यावरून सांगतो, पंतप्रधान मोदी त्याचा बदला नक्कीच घेतील.

बिहारमध्ये बोलताना मोदी म्हणाले होते की, ते दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देतील. वर्ष २०२५ नंतर या जमिनीवर पाकिस्तान नावाचा देश राहणार नाही, असं भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणालेत. पाकिस्तानने घेतलेला काश्मीरचा भाग कोणत्याही किंमतीत परत घेतला जाईल. पाकिस्तानचे विभाजन करून, बलुचिस्तान, पख्तूनिस्तान आणि पंजाब हे वेगळे देश बनतील, असा दावा निशिकांत दुबे यांनी केलाय.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ मार्च रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून यात दोन परदेशातील नागरिकांचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीचं वातावरण आहे. दरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अॅक्शनमोडवर आले आहे. दहशतवाद्यांविरुद्धात मोहीम हाती घेण्यात आली असून त्यांना शोधून त्यांना ठार केलं जात आहे, त्यांची ठिकाणं उद्धवस्त केली जात आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय घेतलाय. भारताच्या या निर्णयानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही बांगलादेशला होणारा पाणीपुरवठा थांबवण्याची मागणी केलीय. बांगलादेशासोबत गंगा नदीच्या पाण्याबाबत करार करण्यात आलाय. १९९६ मध्ये काँग्रेस सरकारने हा करार करून चूक केली असं भाजप खासदार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT