Kota Medical College Hospital SAAM TV
देश विदेश

Oxygen Mask Fire: ICU मध्ये उपचार सुरू असतानाच ऑक्सिजन मास्कला आग, भयंकर घटनेत रुग्णाचा मृत्यू

Kota Medical College Hospital Oxygen Mask Fire: मास्कला आग लागल्यानंतर रुग्णाचा चेहरा आणि मान जळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Chandrakant Jagtap

Kota Oxygen Mask Fire News: राजस्थानच्या कोटा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आयसीयूमध्ये दाखल रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला आग लागल्यानंतर रुग्णाचा चेहरा आणि मान जळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटका आल्याने कोटा मेडिकल कॉलेजमध्ये रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला डॉक्टर सीपीआर देत होते. परंतु सीपीआर देताना रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला करंट लागल्याने आग लागली आणि रुग्णाचा चेहरा आणि मान भाजले गेले. या घटनेत रुग्णाचा जागीच मृत्यू झाला.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाच्या मास्कने पेट घेतल्यावर त्याला वाचवण्याऐवजी कर्मचारी आयसीयूमधून पळून गेले. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू तेथेच झाला. गुरुवारी हा धक्कादायक प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतपुरा तालाब गावात राहणारा वैभव नावाच्या 30 वर्षीय व्यक्तीला गेल्या एक महिन्यापासून सतत पोटदुखीचा त्रास होत होता. जवळच्या डॉक्टरांना दाखवूनही आराम न मिळाल्याने वैभवने वैद्यकीय महाविद्यालयातून उपचार घेणे सुरू केले.

ऑपरेशननंतर बिघडली तब्येत

उपचार घेऊनही वैभवला आराम मिळत नसल्याने डॉक्टरांनी त्याच्या पोटाची सोनोग्राफी टेस्ट केली. त्यात त्याच्या आतड्याला छिद्र असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी १० जुलै रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यानंतर त्यांला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले.

अटॅक आल्याने तब्बेत बिघडली

बुधवारी दुपारी अचानक वैभवची प्रकृती ढासळू लागली. नातेवाईकांनी नर्सला बोलावले. त्यानंतर रुग्णाची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला पुन्हा आयसीयूमध्ये हलवले. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वैभव घबराट होत असल्याने नर्सने त्याला ऑक्सिजनवर ठेवले. वैभवची प्रकृती खालावत असल्याचे पाहून डॉक्टरांना बोलावून वैभवला सीपीआर देण्यात आला. सीपीआरनंतर तो नॉर्मल झाला होता असा दावा वैभवच्या भावाने केला आहे.

आग पाहून कर्मचारी पळून गेले....

सीपीआर दिल्यानंतर डॉक्टर आणि कर्मचारी तेथून निघून गेले. अचानक ऑक्सिजन मास्कने पेट घेतला. आग लागल्याचे पाहून वैभवला वाचवण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर वैभवचा भाऊ गौरवने धाव घेऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत वैभवचा मृत्यू झाला होता. वैभवच्या भावाने सांगितले की, आग विझवली तेव्हा ऑक्सिजन मास्कपूर्णपणे वैभवच्या चेहऱ्याला चिकटला होता. (Tajya Marathi Batmya)

कुटुंबियांनी घातला गोंधळ

वैभवच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासही नातेवाईकांनी नकार दिला. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसोबतच नुकसान भरपाईच्या मागणी देखील यावेळी कुटुंबियांकडून करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Breaking News)

निष्काळजीपणा नाही तर अपघात - डॉक्टर

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.आर.पी.मीना यांनी म्हटले की, हा एक प्रकारचा अपघात आहे. यात निष्काळजीपणा असे काही नाही. आम्ही बोर्डाकडून पोस्टमॉर्टम करून घेऊ. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. समितीच्या चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

SCROLL FOR NEXT