Sushma Andhare News: जी सासू नको नको म्हटलं, तीच वाट्याला आली; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला मिश्किल टोला

Latest Marthi News: सगळ्यांनी नैतिकता सोडलेली आहे सत्तेसाठी वाट्टेल ती तडजोड हे सगळे करू शकतात हे दिसून आल्याचे अंधारे म्हणाल्या.
Sushma Andhare News
Sushma Andhare Newssaam tv
Published On

Maharashtra Politics: जे अजित पवार निधी देत नाहीत असे म्हणून 40 आमदार बाहेर पडले त्यांना अर्थ खाते मिळाले, म्हणजे जी सासू नको नको म्हटली तीच वाट्याला आली अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली. अंधारे नांदेड मध्ये बोलत होत्या. सगळ्यांनी नैतिकता सोडलेली आहे सत्तेसाठी वाट्टेल ती तडजोड हे सगळे करू शकतात हे दिसून आल्याचे अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, दादांचे मनपूर्वक अभिनंदन. दादांच्या सारखा प्रशासनावर पकड असणारा माणूस, ज्यांना वित्त आणि नियोजनाची चांगली जाण आहे. उत्तम प्रकारे त्यांनी खाते याआधीही हाताळलेले आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे हे खातं जाणं आनंददायी आहे. कोणाकडे ना कोणाकडे ते खातं जाणार होतं. दादा सारख्या अनुभवी माणसाकडे जाणार असेल तर दादाचं अभिनंदन.

Sushma Andhare News
Maharashtra Politics: आत्ताची सर्वात मोठी बातमी! अर्थ खातं मिळाल्यानंतर अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, यानिमित्ताने राजकीय नैतिकता हरवली आहे का हा एक नवा प्रश्न उपस्थिती होतो. कारण आमच्याकडून गेलेली चाळीस भावंडांनी जाताना कारण सांगितलं होतं की राष्ट्रवादी सोबत गेल्याने आमचं हिंदुत्व धोक्यात येतं. मग आता यांचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवलंय. असं कोणतं प्रोटेक्टीव कव्हर त्यांनी घातलंय की ज्यामुळे आता त्यांच्या हिंदुत्वाला काहीच धक्का लागत नाहीये. (Tajya Marathi Batmya)

दुसरं म्हणजे त्यांचा नैतिकतेचा आधार उन्मळून पडत आहे. ते ज्या दादांबद्दल तक्रारी करून बाहेर पडले होते तेच दादा आता सत्तेत आले आहेत. म्हणजे जी सासू नको नको म्हटलं, तिच आता वाट्याला आली आहे. त्यामुळे सगळ्याच सुनांची काय चलबिचल सुरू असेल हा खरंच माझ्यासाठी उत्सुकतेचा विषय आहे असे देखील अंधारे म्हणाल्या. (Latest Political News)

Sushma Andhare News
Abdul Sattar First Reaction : माझं खातं बदललं मी खूश आहे, अब्दुल सत्तारांची पहिली प्रतिक्रिया; पण चेहरा बरंच काही सांगून गेला...

'फडणवीस यांना साईड लाईन केले जातंय'

अजित पवार यांना अर्थखातं दिल्यामुळं आता देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप राहणार नाही अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. खातेवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार एकटे दिल्लीला गेले, देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत नव्हते. म्हणजेच भाजपा देवेंद्र फडणवीस यांना साईड लाईन करत आहे. किंबहुना महाराष्ट्रातली देवेंद्र फडणीस यांच्या बद्दलची नकारात्मकतेची कीर्ती केंद्रापर्यंत पोहोचलेली दिसते आणि त्यामुळेच त्यांना बऱ्यापैकी साइड लाइन कें जात आहे असे सुषमा अंधारे म्हणाल्या. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com