Bay of Bengal, Boat capsize Saam TV
देश विदेश

Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात मोठी दुर्घटना, रोहिंग्या निर्वासितांच्या बोटी उलटल्या, ५०० हून अधिक जणांचा मृत्यू

Rohingya refugee boats capsize in Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात रोहिंग्या निर्वासितांच्या दोन बोटी उलटल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

Bay of Bengal, Boat capsize : म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमावर्ती भागातून पळून जाणाऱ्या रोहिंग्यासोबत बंगालच्या उपसागरात अतिशय भीषण दुर्घटना घडली आहे. समुद्रातून प्रवास करणाऱ्या रोहिंग्यांच्या काही बोटी उलटल्याचं समोर आले आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, या दुर्घटनेत ५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित संस्थेने (UNHCR) या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत अद्यापही अनेक लोक बेपत्ता आहेत. खराब हवामान आणि समुद्रातील उंच लाटांमुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजतेय. घटनास्थळावर सध्या मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बोटी जून महिन्याच्या अखेरीस म्यानमारच्या पश्चिम राखाइन राज्यातून निघाल्या होत्या. बोटीवरील प्रवासी सर्व रोहिंग्या समुदायाचे होते. त्यापैकी काहींनी बांगलादेश सीमेवरून प्रवास सुरू केला होता. बंगलाच्या उपसागरात अचानक आलेल्या उंच लाटामुळे दोन्ही बोटी उलटल्या. यात ५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आयओएम आणि यूएनएचसीआर यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, पहिल्या बोटीत २५० लोक होते. ही बोट निघाल्यानंतर थोड्याच वेळात संपर्क तुटला. दुसरी बोट ८ जुलै रोजी बुडाली. म्यानमारमधील इरावदीच्या किनाऱ्याजवळ २८० लोकांना घेऊन जाणारी दुसरी बोट उलटल्याचाही अंदाज आहे. दोन्ही बोटींमधील एकूण ५३० लोक बेपत्ता आहेत. सर्व प्रवाशांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बंगलाच्या उपसागरात दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सध्या सुरू आहे. अनेक मृतदेह मिळाले असून उर्वरित प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.

पावसाळ्यात रोहिंग्या समुद्रमार्गे प्रवास करणे टाळतात. कारण खराब हवामान आणि मोठ्या लाटांमुळे प्रवास अत्यंत धोकादायक होऊ शकतो. UNHCR आणि IOM यांच्या मते, या भागातील अलीकडील मुसळधार पाऊस आणि पुरामुळे बोटीने प्रवास करणे अधिकच धोकादायक बनले आहे. दोन्ही संस्थांनी म्हटले आहे की, जरी घटना आणि मृतांचा आकडा अद्याप अधिकृतपणे निश्चित व्हायचा असला तरी, ही एक मोठी दुर्घटना असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT