Om Birla Political Journey 
देश विदेश

ओम बिर्लांविरोधात आज अविश्वास प्रस्ताव, लोकसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी किती मतांची गरज?

Lok Sabha speaker controversy : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून आज संसदेत यावर चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात हा मुद्दा गाजण्याची शक्यता.

Namdeo Kumbhar

Om Birla no confidence motion : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय, त्यावर आज चर्चा होणार आहे. सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाचा उत्तरार्ध वादळी होण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव, पश्चिम आशियातील युद्ध, इराणबद्दल सकारची भूमिका, रशियाकडून तेल खरेदी, पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन या मुद्द्यांवरून संसदेतील वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, सदनात उपस्थित राहण्यासाठी भाजप, काँग्रेस यांनी आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे.

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव -

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांकडून प्रस्ताव मांडला जाणार आहे.त्यामुळे आज सभागृहात हा चर्चेचा मुख्य विषय आहे.

लोकसभा अध्यक्षांविरोधात नोटीस कशी मंजूर होईल?

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करायचा असेल तर कमीत कमी ५० सदस्यांचा पाठिंबा लागतो. अविश्वास प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्यावर चर्चा करून मतदान केले जात. पण ५० सदस्यांनी पाठिंबा दिला नाही तर प्रस्ताव अमान्य केला जातो. त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आपल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे.

अविश्वास प्रस्ताव का आणला जात आहे?

मोहम्मद जावेद, के. सुरेश आणि मल्लू रवी या काँग्रेस सदस्यांकडून लोकसभेत सूचना मांडली जाईल. अध्यक्षांचे सभागृहातील वर्तन, विरोधकांना बोलू न देणे, महिला खासदारांवर आरोप. या कारणांमुळे विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव मांडला जात आहे. माजी पंतप्रधानांविरुद्ध पूर्णपणे आक्षेपार्ह आणि अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना अक्ष्यक्षांनी फटकारले नाही, असा आरोपही काँग्रेसने केला.

ओम बिर्ला सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाचे उघडपणे समर्थन करतात आणि त्यांच्या या सर्व कृती या सभागृहाच्या कामकाजासाठी अयोग्य आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याचा प्रस्ताव विरोधकांकडून आज मांडला जाणार आहे.

ओम बिर्ला सभागृहात राहतील का?

या प्रकरणादरम्यान ओम बिर्ला यांना सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी संविधानाने दिली आहे. ते स्वतःचा बचाव करू शकतात आणि प्रस्तावावर मतदान करू शकतात. पण प्रकरणावर चर्चा सुरू असताना ते कामकाजाचे अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत.

इतर सदस्यांप्रमाणे ओम बिर्ला यांच्याकडे प्रभाग क्रमांक नाही. त्यामुळे जर प्रस्ताव मतदानासाठी आला तर ते स्वयंचलित मतदान प्रणाली वापरू शकणार नाहीत. त्यांना त्यांचे मत नोंदवण्यासाठी स्लिप वापरावी लागेल. आकडे सरकारच्या बाजूने आहेत, त्यामुळे हा अविश्वास ठराव पराभूत होऊ शकतो हे जवळजवळ निश्चित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT