PM Modi on Avishwas Prastav Saam TV
देश विदेश

PM Modi On Avishwas Prastav: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधक आक्रमक, सभागृहात 'मणिपूर.. मणिपूर...'च्या घोषणा

PM Narendra Modi in Loksabha: जवळपास १ तास झाला तरी मोदींनी मणिपूरवर भाष्य न केल्याने विरोधक आक्रमक झाले.

प्रविण वाकचौरे

PM Modi Speech on Avishwas Tharav:

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलत आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. मात्र भाषण सुरु होऊन जवळपास १ तास झाला तरी मोदींनी मणिपूरवर भाष्य न केल्याने विरोधक आक्रमक झाले.

मणिपूरवर बोलण्याची मागणी विरोधक करत आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. मणिपूर.. मणिपूर.. वी वॉन्ट मणिपूर..., इंडिया... इंडिया... अशा घोषणा विरोधक सभागृहात देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरवर भाष्य करावे, अशी मागणी विरोधक करत आहे.

विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ

त्यावेळी जनेतेने पूर्ण विश्वास दाखवला आणि निवडणुकीत NDA आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ आहे. 2024 च्या निवडणुकीत NDA आणि भाजप आधीचे रेकॉर्ड तोडून पुन्हा सत्तेत येणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.  (Latest Marathi News)

विरोधकांसाठी नो कॉन्फिडन्स

विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. पण जनतेने पूर्ण विश्वासाने यांच्यासाठी नो कॉन्फिडन्स घोषित केले. निवडणुकीत एनडीए आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ आहे. २०२४ च्या निवडणुकीत एनडीए आणि भाजप आधीचे सर्व रेकॉर्ड मोडून पुन्हा सत्तेत येणार, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

भारताचे तुकडे केले

पुढे मोदींनी म्हटलं की, विरोधी पक्षांच्या सहकाऱ्यांप्रती शोक व्यक्त करायचा आहे. नुकतेच बंगळुरूमध्ये जवळपास दोन दशके जुन्या यूपीएचे त्यांनी अंतिम संस्कार केले आहे. काँग्रेसला स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी एनडीएचा आधार घ्यावा लागला. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी भारताचे I.N.D.I.A. असे तुकडे केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

SCROLL FOR NEXT