Operation Sindoor Explained saam tv
देश विदेश

ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं? पाकिस्तानच्या नांग्या कशा ठेचल्या? अभ्यासकांनी दिली इत्यंभूत माहिती | Operation Sindoor

Indias Surgical Strike: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या ९ दहशतवादी अड्ड्यांवर एअर स्ट्राईक करत भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नेमकं कसं राबवलं गेलं? या स्ट्राईक मागची रणनीती काय होती? अभ्यासकांनी दिली सविस्तर माहिती.

Bhagyashree Kamble

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या आहेत. पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर एअर स्ट्राईक करत भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. यामुळे सध्या प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान झळकत आहे.

पण ऑपरेशन सिंदूर नेमकं सक्सेसफुल कसं झालं? या स्ट्राईक मागची रणनीती काय होती, स्ट्राईक कसा आखला गेला, आणि भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याबाबत संरक्षण आणि दहशतवाद विरोधी धोरणांच्या अभ्यासक स्नेहा कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

ऑपरेशन सिंदूरबाबत स्नेहा कुलकर्णी म्हणाल्या, 'ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालं याचा आनंदच आहे. या स्ट्राईकमध्ये भारताने नवीन तंत्रज्ञानाची शस्त्रं पहिल्यांदाच वापरली आहे. भारत नवीन तंत्रज्ञानाच्या शस्त्रांचा प्रभावी वापर करू शकतो, हे या कारवाईतून सिद्ध झालं आहे', असं स्नेहा कुलकर्णी म्हणाल्या.

'या ऑपरेशनमध्ये सुमारे ७० टक्के कारवाई भारतीय लष्कराने आणि ३० टक्के कारवाई भारतीय हवाई दलाने पार पाडली' अशी माहिती स्नेहा कुलकर्णी यांनी दिली.

'या स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून काही फेक मेसेजेस आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. तसेच, या कारवाईत पाकिस्तानमधील नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अपप्रचार पाकिस्तानकडून सुरू आहे', अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, पाकिस्तानकडून भारतावर थेट हल्ला करण्याची शक्यता फारच कमी असल्याचं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT