BLA Attacks Pakistan Military 
देश विदेश

Pakistan : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांना दुसरा हादरा, BLA चा IED हल्ला, १४ पाकिस्तानी सैनिकाच्या चिंधड्या, VIDEO आला समोर

Pakistan soldiers killed : ऑपरेशन सिंदूरनंतर बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या १४ सैनिकांना आयईडी हल्ल्यात उडवलं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाकिस्तानसमोरील अंतर्गत संकट अधिक गडद झालं आहे.

Namdeo Kumbhar

BLA Attacks Pakistan Military : भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांचा खात्मा केला. या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली, दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला २४ तासात आणखी एक हादरा बसलाय. पाकड्यांच्या सैनिकांना बलुच लिबरेशन आर्मीने हिसका दाखवलाय. ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून बाहेर येण्याच्या आतच बलुच आर्मीने आणखी एक हादरला दिला. पाकिस्तानी सैन्याची गाडी आईडी ब्लास्टने उडवली. या हल्ल्यात पाकिस्तानच्या १४ सैन्यांच्या चिंधड्या झाल्या. बलुच आर्मीने पाकिस्तान आणि चीन या दोघांना इशारा दिलाय. बलुचिस्थान सोडा, अन्यथा आणखी असेच मोठे हल्ले होतील. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने दोन स्वतंत्र हल्ल्यांमध्ये १४ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. हे हल्ले बोलन आणि केच जिल्ह्यांत झाले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली. बीएलएच्या विशेष टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने बोलनमधील माच परिसरात रिमोट-नियंत्रित आयईडीद्वारे लष्करी ताफ्यावर हल्ला केला. यात विशेष ऑपरेशन्स कमांडर तारिक इम्रान आणि सूबेदार उमर फारूक यांच्यासह १२ सैनिकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या हल्ल्यात केचमधील कुलाग तिग्रान येथे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडवर आयईडी हल्ला झाला, ज्यात दोन सैनिक ठार झाले. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलुच यांनी पाकिस्तानी लष्कराला "चिनी भांडवलावर चालणारी भाडोत्री टोळी" म्हटले आहे. बलुचिस्थान सोडा अन्यथा आणखी मोठा हल्ला केला जाईल, असा इशाराही दिला. बलुचिस्तानातील खनिज संपत्तीचा स्थानिकांना लाभ न मिळता केंद्रीय सरकार आणि परदेशी गुंतवणूकदारांना फायदा होत असल्याचा आरोपही केला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर बीएलएच्या हल्ल्यांनी पाकिस्तानसमोरील अंतर्गत आणि बाह्य आव्हाने उभी ठाकली आहेत. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, बलुचिस्तानातील हल्ले आणि भारत-पाक तणाव यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, तर पाकिस्तानने प्रत्युत्तराची धमकी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT