Walking Benefits: सकाळी की संध्याकाळी? वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी चालणे जास्त फायदेशीर ठरते?

Shruti Vilas Kadam

सकाळी चालण्याचे फायदे

सकाळी रिकाम्या पोटी चालल्यास शरीर साठवलेली चरबी जास्त प्रमाणात जाळते. यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस लवकर सुरू होते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.

Walking Benefits | SaamTv

मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी सकाळी चालावे

सकाळी चालल्याने मेटाबॉलिझम दिवसभर सक्रिय राहतो. त्यामुळे दिवसभरात अधिक कॅलरीज बर्न होतात, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

Walking Benefits | Saam Tv

संध्याकाळी चालण्याचे फायदे

संध्याकाळी चालल्यास दिवसभराचा ताण कमी होतो. कामाचा थकवा निघतो आणि चालताना शरीर अधिक ताकदीनं प्रतिसाद देते, त्यामुळे चालण्याचा वेग चांगला राहतो.

Walking Benefits | Saam Tv

जेवणानंतर चालण्याचा फायदा

संध्याकाळी किंवा रात्री जेवणानंतर 10–15 मिनिटे हलके चालल्यास पचन सुधारते. यामुळे चरबी साठण्याचा धोका कमी होतो आणि वजन नियंत्रणात राहते.

Walking Yoga Benefits

सातत्य जास्त महत्त्वाचे

वजन कमी करण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळ यापेक्षा दररोज नियमित चालणे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा चालणे शक्य असेल तोच वेळ सर्वोत्तम मानावा.

Walking Benefits | Canva

किती वेळ चालणे आवश्यक?

वजन कमी करण्यासाठी दररोज किमान 30 ते 45 मिनिटे ब्रिस्क वॉक करणे फायदेशीर ठरते. वेग आणि वेळ सातत्याने ठेवणे गरजेचे आहे.

walking benefits | goggle

कोणती वेळ जास्त फायदेशीर?

वैज्ञानिकदृष्ट्या पाहता सकाळी चालणे वजन कमी करण्यासाठी थोडे अधिक फायदेशीर मानले जाते. मात्र संध्याकाळी नियमित चालणाऱ्यांनाही उत्तम परिणाम मिळतात.

Walking | canva

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

Upit Recipe
येथे क्लिक करा