India vs Pakistan conflict Saam TV
देश विदेश

भारतानं दहशतवादी तळांवर केले हवाई हल्ले, पाकिस्तानने भारतात नागरिकांवर केला गोळीबार, VIDEO

Pakistani army attack on civilians at Poonch : पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला.

Namdeo Kumbhar

India vs Pakistan conflict cross-border firing : भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्रीच्या या कारवाईने संतप्त झालेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पुंछसह नियंत्रण रेषेजवळील गावांवर गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले. यात १० नागरिकांचा मृत्यू झाला, तर ४४ जण जखमी झाले. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत त्यांच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या. पुंछमधील काही भाग यापूर्वीच रिकामे केल्याने पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना यश आले नाही. पाकिस्तानच्या हल्ल्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील एलओसी गावांवर अंदाधुंद गोळीबार केला. पुंछ जिल्ह्यातील या हल्ल्यात आतापर्यंत १० नागरिकांचा मृत्यू झाला असून ४४ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पीओकेमधील एका रहिवाशाने या हल्ल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून भारतीय पत्रकारांना पाठवला. या व्हिडिओमुळे पाकिस्तानच्या क्रूर कारवायांचा आणखी एक पुरावा समोर आला आहे.

पाकिस्तानचा हा हल्ला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर असल्याचे बोलले जातेय. २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑरेशन सिंदूर राबवले होते. पण पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यामध्ये निष्पाप १० जणांना जीव गमावावा लागला. पुंछमधील अनेक गावांमध्ये घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलेय. अनेक पाकिस्तानी चौक्या आणि तोफखान्याच्या जागा उद्ध्वस्त केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने सीमावर्ती भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

SCROLL FOR NEXT