One Nation, One Election Saam Tv
देश विदेश

One Nation One Election : 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक आज सादर होणार; भाजपकडून व्हिप जारी

One Nation, One Election Bill Likely In Lok Sabha : लोकसभेत आज 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक सादर होणार आहे. भाजपकडून सर्व खासदारांना दोन ओळीचा व्हीप जारी केलाय. या विधेयकाच्या विरोधात विरोधकांनी संसदेत आंदोलन करण्याची योजना आखली आहे.

Namdeo Kumbhar

One Nation One Election, Parliament Winter Session : वन नेशन वन इलेक्शन विधेयक आज लोकसभेत सादर केले जाणार आहे. सत्ताधारी भाजपकडून आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे. एनडीएच्या घटक पक्षांकडूनही या विधेयकाला (One Nation One Election) पाठिंबा मिळाला आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन मेघवाल आज दुपारी १२ वाजता हे विधेयक मांडणार आहे. या विधेयकाच्या विरोधात काँग्रेस आघाडीकडून आंदोलानाची योजना आखली आहे. त्यामुळे संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून आज दुपारी १२ वाजता लोकसभेत एक देश एक निवडणूक हे विधेयक मांडले जाणार आहे. गुरुवारी (१२ डिसेंबर) दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळानं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्चस्तरीय समितीच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली होती. आज हे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मांडले जाईल.

विरोधकांकडून घेरण्याची तयारी केली जात आहे. पण या विधेयकामुळे होणाऱ्या फायद्याची यादी सत्ताधाऱ्यांकडून सांगितली जात आहे. देशात एकाच वेळी निवडणुका घेतल्या तर काय फायदा होईल, याबाबत सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. एक देश एक निवडणूक हे विधेयक मंजूर झाले तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकावेळीच देशातील सर्व राज्याच्या विधानसभा निवडणुका एकत्र होतील.

एक देश एक निवडणुकीचा काय फायदा होणार?

एक देश एक निवडणुकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा भाषणावेळी सांगितले होते. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतानाही मोदींनी एक देश एक निवडणुकीसंदर्भात भाष्य केले होते. हिवाळी अधिवेशनावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूरी देण्यात आली. आज संसेद विधेयक मांडले जाणार आहे. एक देश एक निवडणुकाची दोन टप्प्यात अंमलबजावणी करण्याची तयारी असेल. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होतील. त्यानंतर तीन महिन्यात दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका होतील. एक देश एक निवडणुकीमुळे आयोगावरील खर्च कमी होणार आहे.

कांग्रेसकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

वन नेशन एक इलेक्शन विधेयकावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपला परिवर्तनासाठी महत्त्वाचे विधेयक आणायचेय. पण सरकार आपली हुकूमशाही सोडायला तयार नाही. त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर आधी चर्चा करायला हवी होती. आज 'वन नेशन वन इलेक्शन' आहे, मग 'वन नेशन, वन पार्टी' असेल आणि मग 'वन नेशन, वन लीडर' असेल. त्यांच्या हेतूला आम्ही यश येऊ देणार नाही. त्यांना घटनादुरुस्ती करायची आहे, त्यांना दोन तृतीयांश बहुमत कुठून मिळणार? महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Municipal Corporation: २.५ लाख भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप! काय होणार बदल? VIDEO

Hema Malini: ड्रीम गर्ल ते बसंती...; हेमा मालिनीच्या 'या' भुरळ पाडणाऱ्या खास भूमिका

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे बैठकीला थेट दुचाकीवरून पोहचल्या

Truck Accident: भीषण अपघात; बोगद्याजवळ ट्रक उलटला,एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान

SCROLL FOR NEXT