A receipt from 1934 shows a bicycle bought for ₹18 – a nostalgic memory that touches millions. Saam TV News
देश विदेश

Old Cycle Bill : फक्त १८ रूपयात मिळायची सायकल, ८८ वर्षापूर्वी बिल पाहिलेत?

old cycle receipt News : सायकल म्हणजे फक्त वाहन नव्हे, ती भावना होती. आजच्या बाइक-कारच्या युगात सायकल हरवत चालली असताना, ८८ वर्षांपूर्वीचं सायकलचं एक बिल सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Old Cycle Cost Only ₹18 in 1934 : काळानुसार जग बदलते, पण काही आठवणी कायम आपल्या मनात घर करून राहतात. अनेकांकडे आठवणींचा पेटारा आजही आहे. जुन्या वस्तू, मग त्या मातीच्या माठापासून ते जुन्या गाड्यापर्यंत अनेकजण काही वस्तू सांभाळून ठेवतात. काहीजण आपण घेतलेल्या पहिल्या वस्तूचे बिल जपून ठेवतो. असाच एक १९३४ मधील अनमोल ठेवा समोर आला आहे. होय... ८८ वर्षांपूर्वी घेतलेल्या सायकलचे बिल समोर आले आहे. त्या वेळी सायकलची किंमत फक्त १८ रूपये इतकी होती. आज सायकलची किंमत ७ ते १० हजार रूपयांच्या आसपास असेल. सायकलचे ८८ वर्षांपूर्वीचे बिल एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केलेय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सायकलच्या या बिलाने अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. “९० वर्षांपूर्वीच्या सायकलचं बिल, फक्त १८ रुपये! तेव्हाचे १८ रुपये म्हणजे आजचे 1800 रुपये असतील का? असा प्रश्न युजर्सने सोशल मीडियावर विचारला आहे. सायकलचे हे ८८ वर्षांपूर्वीचे बिल पाहून अनेकांच्या डोळ्यासमोर मातीच्या रस्त्यावर धावणाऱ्या सायकली, मुलांचे हसरे चेहरे समोर आले असतील. मुलांच्या शिक्षणासाठी, कामावर जाण्यासाठी, कुटुंबाच्या आनंदासाठी त्यावेळी सायकल घेतली जात होती.

रंगीत टीव्ही आला नव्हता, दुचाकी तितक्या नव्हत्या. त्या काळात सायकल म्हणजे फक्त वाहन नव्हतं, तर एक भावना होती. गावातून शहरात जाणारी, शाळेतून घरी येणारी, मित्रांसोबत फेरफटका मारणारी ती सायकल प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती. आज बाइक आणि कारच्या या युगात सायकलचं विश्व हरवलंय. पण ८८ वर्षांपूर्वीची बिल पाहताना मन हरखून जातं. त्या १८ रुपयांमध्ये किती प्रेम, किती मेहनत आणि किती आनंद सामावला असेल, याची कल्पना करता येत नाही. तुम्ही कधी सायकल चालवली? तुम्ही किती रूपयांना सायकल विकत घेतली? सायकलसोबतची तुमची आठवण काय जोडली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT