Odisha Train Accident X (Twitter)
देश विदेश

Odisha Train Accident : ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात, कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डब्बे रुळावरुन घसरले

Odisha Train Accident News : ओडिशामध्ये पुन्हा एकदा मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये कामाख्या एक्स्प्रेसच्या ट्रेनच्या एसी कोचचे ११ डब्बे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Odisha : ओडिशामध्ये रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. बेंगलुरु ते आसामला जाणारी कामाख्या एक्स्प्रेसचा भीषण झाला आहे. कामाख्या एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी कोचचे ११ डब्बे रुळावरुन घसरले आणि त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. चौद्वार परिसरातील मांगुली पॅसेंजर हॉल्टजवळ मालगाडी रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

बेंगळुरु-कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनचा आज (३० मार्च) रात्री ११.५४ वाजता कटक, ओडिशातील चौद्वारजवळ अपघात झाला. ट्रेनचे ११ एसी डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर नीलाचल एक्स्प्रेस, धौली एक्स्प्रेस, परुलिया एक्स्प्रेसचे मार्ग वळवण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. वैद्यकीय पथक, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान अपघातग्रस्त लोकांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा यांनी या अपघाताची माहिती दिली. ते म्हणाले, आम्हाला कामाख्या एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत एसीचे ११ डबे रुळावरुन घसरले आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. अपघात निवारण गाड्या, आपत्कालीन वैद्यकीय पथके पाठवण्यात आली आहेत.

रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहेत, तर डीआरएम खुर्दा रोड, जीएम/ईसीओआर आणि अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी तपास केल्यानंतर हा अपघात कसा झाला हे समोर येईल. अपघातग्रस्त मार्गावर मागे थांबलेल्या गाड्या वळवणे आणि घटनास्थळाची स्थिती सुधारणे याकडे आम्ही लक्ष देत असल्याचे सीपीआरओ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

महिनाभर रोज एक बदाम खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील?

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

SCROLL FOR NEXT