Section 144 Imposes In Balasore Saam Tv
देश विदेश

Odisha News: ओडिशामध्ये दोन गटात मोठा वाद, ३० पेक्षा जास्त जणांना अटक; बालासोरमध्ये कर्फ्यू लागू

Section 144 Imposes In Balasore: ओडिशामध्ये दोन गटांमध्ये मोठा वाद झाला. या हिंसक संघर्षानंतर बालासोरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने शहरातील काही संवेदनशील भागात इंटरनेट सेवाही बंद केली

Priya More

ओडिशातील (Odisha) बालासोरमध्ये दोन गटांमध्ये मोठा वाद झाला. दोन गट आमने सामने आले. या वादाला हिंसक वळण आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. हिंसक संघर्षानंतर बालासोरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने शहरातील काही संवेदनशील भागात इंटरनेट सेवाही बंद केली असून लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहनही केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जूनच्या मध्यरात्रीपासून १८ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सोमवारी बालासोरचे जिल्हा दंडाधिकारी आशिष ठाकरे यांच्याशी संपर्क करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्यास सांगितले.

गोवंशाच्या कुर्बानीनंतर रस्त्यावर वाहत असलेल्या रक्ताच्या निषेधार्थ सोमवारी शहरातील भुजखिया पेर परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, दुसऱ्या गटाने त्यांच्यावर दगडफेक केली. त्यानंतर हाणामारी झाली. अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार बालासोरमध्ये तळ ठोकून आहेत. बालासोरमध्ये पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला.

याप्रकरणी आतापर्यंत जवळपास ३० जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटी रोडचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. कोणीही घरातून बाहेर पडणार नाही. नागरिकांना घराबाहेर पडण्यास आणि वाहनं चालवण्यास परवानगी दिली जाणार नाही. आपत्कालीन वैद्यकीय मदतीशिवाय लोकांना बाहेर पडण्याची परवानगी नाही.

बालासोरचे पोलिस अधीक्षक सागरिका नाथ यांनी सांगितले की, 'बालासोर नगरपालिका क्षेत्रात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सर्व मार्केट आणि दुकाने बंद राहतील.' एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'संवेदनशील भागात पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पण सोमवारी काही ठिकाणी हिंसाचार झाल्याच्या घटना घडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT