Rahul Gandhi On Women Reservation Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi : डरो मत... महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेवेळी राहुल गांधी ओबीसी मुद्द्यावर बोलले

Rahul Gandhi On Women Reservation: डरो मत... महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेवेळी राहुल गांधी ओबीसी मुद्द्यावर बोलले

Satish Kengar

Rahul Gandhi On Women Reservation:

आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. यावरच बोलताना काँग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी म्हणाले की, ''महिला आरक्षण विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, हे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.''

ते म्हणाले की, ''महिलांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. हे लोक आपल्या बरोबरीचे आहेत आणि अनेक बाबतीत आपल्याही पुढे आहेत, पण बिल अपूर्ण आहे. यामध्ये इतर मागासवर्गीयांना (OBC) आरक्षण देण्याची आमची मागणी आहे.''

'सरकारमधील 90 सचिवांपैकी केवळ 3 ओबीसी'

ओबीसीचा मुद्दा लावून धरत राहुल गांधी म्हणाले की, ''केंद्र सरकारमधील 90 सचिवांपैकी केवळ 3 ओबीसी आहेत. संस्थांमधील ओबीसींच्या टक्केवारीबाबत संशोधन करण्यात आलं आहे.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, पण केंद्र सरकारमधील 90 सचिवांपैकी केवळ 3 ओबीसी समाजातील आहेत. ते भारताच्या बजेटच्या पाच टक्के नियंत्रित करतात.''

राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करत हा ओबीसींचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच महिला आरक्षण विधेयकाला जनगणना आणि सीमांकनाची गरज नसल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT