Diabetes cases on a rise in India Saam Tv
देश विदेश

Diabetes cases on a rise in India: भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची धक्कादायक आकडेवारी समोर

Vishal Gangurde

New Delhi: भारतात सातत्याने मधुमेह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशातच एका नव्या अभ्यासाने मधुमेह रुग्णांची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर आली आहे. भारत जगातील मधुमेह रुग्णांची राजधानी होऊ लागल्याचे चिन्ह दिसत आहे. (Latest Marathi News)

'द लँसेट'च्या अभ्यासानुसार, भारतात सध्य स्थितीत १०.१ कोटी लोकांना मधुमेह झाला आहे. अभ्यासानुसार, गेल्या चार वर्षात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या ४४ टक्क्यांनी वाढली आहे.

द लँसेट डाटाबिटीज अँड अँडोक्रिनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च-इंडिया डायबिटीज (ICMR-INDIAB) ने याचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

अभ्यासात म्हटले आहे की, भारतात २०१९ साली सात कोटी रुग्ण होती. आता या संख्येत ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात १५.३ टक्के लोक प्री-डायबिटीसच्या पातळीवर आहे. मधुमेह होण्याआधी त्याची लक्षणे व्यक्तीमध्ये दिसू लागतात.

जागतिक आरोग्य संघटनेने अंदाज वर्तविला होता की, भारतात जेव्हा ७.७ कोटी लोक मधुमेह ग्रस्त होतील. मात्र, आता अभ्यासातून स्पष्ट झाले की, देशात १०.१ कोटी लोकांना मधुमेह झाला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज होता की, देशात २.५ कोटी लोकांमध्ये प्री-डायबिटीसचे लक्षणे दिसून येतील. मात्र, अभ्यासातून मोठा आकडा समोर आला आहे. अभ्यासातून समोर आलेला आकडा चिंतेत टाकणारा आहे.

व्यायाम करून मधुमेहाच्या लक्षणावर नियंत्रण ठेवा

बदलत्या जीवनशैलीमुळे देशात मधुमेहांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मधुमेहाचा आजार ताणतणाव, आनुवंशिक तेमुळे देखील होण्याची शक्यता असेत. शरीरात साखरेचं प्रमाण वाढल्याने मधुमेहाचा आजार बळावतो.

या मधुमेहाच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत व आहाराने साखरेचे पातळी नियंत्रणात आणावी लागते. तसेच त्यासाठी सकाळी थोडा व्यायाम केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT