Priya More
डायबिटीज हा चयापचयाशी संबंधित आजार आहे. जगभरातील मोठ्या संख्येने लोकं या आजाराने त्रस्त आहेत.
या आजारामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य प्रमाणात राहत नाही.
वेळीच उपचार नाही घेतले तर हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, डोळ्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
डायबिटीज हा आजार तीन प्रकारचा असतो. वेळीच काळजी नाही घेतली तर हा आजार जीवावर बेतू शकतो.
टाइप-1 डायबिटीज हा ऑटोइम्यून आजार आहे. या समस्येमध्ये रोगप्रतिकारक प्रणाली व्यक्तीच्या स्वादुपिंडातील ऊतींवर हल्ला करते आणि त्यामुळे इन्सुलिन तयार होते.
शरीर जेव्हा इन्सुलिनला प्रतिरोधक करू लागते तेव्हा टाइप-1 डायबिटीज होतो. यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. हा डायबिटीज सर्वात सामान्य प्रकार आहे.
गर्भधारणेदरम्यान रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे याला जेस्टेशनल डायबिटीज असे म्हणतात. हा इन्सुलिनचे उत्पादन रोखणाऱ्या प्लेसेंटा निर्माण करणाऱ्या हार्मोन्समुळे होतो.