India Corona Patient Saam Tv News
देश विदेश

Corona Update : कोरोनाचं संकट वाढलं, देशात ३ हजारांवर रुग्ण; महाराष्ट्रात रुग्णसंख्या धडकी भरवणारी

India Corona Patient : कोरोनाच्या संकटानं भारताचं दार वाजवलंय. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार पार गेलीय. मात्र कोणत्या राज्याला कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून.

Prashant Patil, Girish Nikam

गिरीश निकम, साम टिव्ही

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढलंय. देशात आतापर्यंत ३ हजार ३९५ कोरोना रुग्ण आढळलेत. दिल्लीत या वर्षातला पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय. राजधानी दिल्लीत रुग्णसंख्या २९४ वर जाऊन पोहचली आहे. तर महाराष्ट्रातही कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ४६७ वर पोहोचलीय. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोविड १९चे ८४ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत राज्यात नोंद झालेल्या कोरोन संसर्गाची एकूण रूग्णसंख्या ६८१ झाली आहे. त्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४६७ आहे. कोरोना वेगानं पसरत असला तरी घाबरु नका, असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहे. देशभरातील आकडेवारी एक नजर टाकूया

केरळ - १३३६

महाराष्ट्र - ४६७

दिल्ली - ३७५

गुजरात - २६५

कर्नाटक - २६४

राज्यातील वैद्यकीय तज्ञांनी नागरिकांना सूचना केल्या आहेत

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा सौम्य आहे. मात्र, त्याचा परिणाम गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांवर होत आहे. त्यामुळे मागील अनुभव लक्षात घेत राज्यातल्या अनेक शासकीय रुग्णालयात कोरोना उपचाराचे विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. मात्र नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करणे गरजेचे आहे. सध्या स्वत:ची काळजी स्वत: घेणे हाच उत्तम पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT