North Korea Missile Launch  साम टीव्ही मराठी
देश विदेश

आणखी एका युद्धाचा भडका? उत्तर कोरियानं डागल्या एकापाठोपाठ एक मिसाईल, २ देश अलर्ट; पंतप्रधान म्हणाले...

North Korea missile launch : उत्तर कोरियाने सलग बॅलिस्टिक मिसाईल डागल्यामुळे जपान आणि दक्षिण कोरिया अलर्टवर गेले आहेत. वाढत्या तणावामुळे आशियात युद्धाची शक्यता निर्माण झाली.

Namdeo Kumbhar

North Korea Missile Launch : जगात आणखी एका युद्धाचा भडका उडणार का? अशी परिस्थिती सध्या तयार झाली आहे. कारण, किम जोंग यांच्या उत्तर कोरियाने एकापाठोपाठ एक अनेक बॅलिस्टिक मिसाइल डागल्या आहेत. उत्तर कोरियानं मिसाइल डागल्यामुळे दक्षिण कोरिया, जपान या दोन देशांमध्ये एकच खळबळ उडाली असून अलर्टमोडवर गेले आहेत. किम जोंग उन यांनी मिसाइल गेल्या काही दिवसांत चौथ्यांदा मिसाइलच्या चाचण्या केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जपान सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

सार्वजनिक सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी जपान सरकारने आपल्या सर्वोच्च स्तरावरील संकट व्यवस्थापन प्रणाली सक्रिय केली आहे. पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी पहाटेच्या वेळी वाढलेल्या तणावावर एक्सवर माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आज सकाळी ०६:०० वाजता, उत्तर कोरियाकडून अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली असावीत. क्षेपणास्त्रे असू शकणाऱ्या वस्तू जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (EEZ) आधीच पडल्या आहेत. सध्या जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरिया या माहितीचे विश्लेषण करत आहेत.

इराण संकटात अमेरिकेच्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली आहेत. मागील३ आठवड्यातील चौथी आणि या वर्षातील सहावी चाचणी किम जोंग उन यांनी केली आहे. उत्तर कोरिया या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या माध्यमातून सातत्याने आपली ताकद दाखवत आहे. उत्तर कोरिया आपला अणुकार्यक्रम वेगाने विस्तारत आहे. यामुळे आशियातील सुरक्षेची चिंता आणखी वाढल्याचा इशारा याआधीच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) दिला आहे.

उत्तर कोरियाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मिसाइल चाचण्यांमुळे होणारा संभाव्य धोका पाहून जपान सरकारने सागरी आणि हवाई वाहतुकीला असलेले संभाव्य धोके कमी करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज केली. "सरकार म्हणून प्रक्षेपणानंतर लगेचच, आम्ही माहिती गोळा करण्यासाठी पंतप्रधानांच्या कार्यालयातील संकट व्यवस्थापन केंद्रात आपत्कालीन पथकाची बैठक बोलावली. त्याच वेळी मी, मंत्रालये आणि संस्थांना माहिती गोळा करण्याचे आणि विश्लेषणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत, असे जपानचे पंतप्रधान म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT