Nokia X30 5G
Nokia X30 5G Saam Tv
देश विदेश

Nokia 5G Smartphone Offer: पाण्यात पडला तरी होणार नाही खराब, Nokiaच्या 'या' 5G स्मार्टफोनवर तब्बल 12 हजारांची सूट

Priya More

Nokia Smartphone: तुम्ही जर नोकियाचा स्मार्टफोन (Nokia Smartphone) विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. कारण नोकिया कंपनीने आपल्या एका प्रिमियम स्मार्टफोनची किंमत खूपच कमी केली आहे. नोकियाने आपल्या Nokia X30 5G या स्मार्टफोनची किंमत तब्बल 12 हजार रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे अगदी स्वस्तात तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.

Nokia X30 5G चे खास वैशिष्ट्य म्हणजे हा स्मार्टफोनला IP67 रेटेड वॉटर रेजिस्टेंस मिळतो. याचाच अर्थ की, हा स्मार्टफोन पाण्यात पडला तरी तो खराब होणार नाही. तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये Nokia X30 5G या स्मार्टफोनची किंमत 48,999 रुपये ऐवढी आहे. पण कंपनीने या स्मार्टफोनवर आता 12 हजारांची सूट दिली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन तुम्ही फक्त 36,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

Nokia X30 5G हा स्मार्टफोन फक्त 8GB +256 GB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तसंच, क्लाउड ब्लू आणि आइस व्हाइट या दोन कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही बँक ऑफर्सचा देखील फायदा घेऊ शकता. त्यामुळे आणखी स्वस्तामध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करात येऊ शकतो.

नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, 700 nits च्या पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह येतो. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 SoC प्रोसेसर आहे. जो 8GB RAM आणि 256GB स्टोरेजशी संबंधित आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.1, NFC असे पर्याय दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 4200mAh बॅटरी आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनचे डिव्हाइस Android 12 वर चालते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Man Killed girlfriend : प्रेमाचा भयंकर शेवट! मनालीला फिरायला नेलं, गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये कोंबला

Today's Marathi News Live :झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोर्टाचा दिलासा नाहीच

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT