Interesting News: पृथ्वीवर कोंबडी आधी की अंडी? Chat GPT ने दिले प्रचंड उत्सुकता असलेल्या प्रश्नाचे उत्तर

Chat GPT reveals big secret : एका यूजने Chat GPT ला अनेकांना उत्सुकता असलेला 'पृथ्वीवर कोंबडी आधी की अंडी' असा प्रश्न विचारला.
Chatgpt Answers on chicken first or egg
Chatgpt Answers on chicken first or eggsaam tv

Chatgpt Answers on chicken first or egg: चॅट GPT बद्दल सध्या लोकांमध्ये कमालिची उत्सुकता आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तत्रज्ञानाचा वापर करून लोक अनेक प्रश्नांची उत्तरे शोधताना दिसतात. अतिशय प्रभावी असलेले हे Chat GPT सध्या अतिशय लोकप्रिय बनले आहे. Chat GPT ला कोण कधी काय प्रश्न विचारेल सांगता येत नाही. असाच एक प्रश्न आणि त्याचं उत्तर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

एका यूजने Chat GPT ला अनेकांना उत्सुकता असलेला 'पृथ्वीवर कोंबडी आधी की अंडी' असा प्रश्न विचारला. Chat GPT ने या प्रश्नाचे तेवढेच प्रभावी उत्तर दिले आहे. खरंतर हा प्रचंड उत्सुकता असलेला आणि तेवढी गमतीशीरपणे चर्चीला जाणारा प्रश्न आहे. याचे उत्तर शोधण्यासाठी लोक उत्सुक आहेत. त्याचे उत्तर उत्तर मिळू शकलेले नाही. परंतु Chat GPT ने त्यावर जबरदस्त उत्तर दिले आहे.

Chatgpt Answers on chicken first or egg
Sanjay Raut on Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं - संजय राऊत

काय उत्तर आले...?

पृथ्वीवर कोंबडी आधी की अंडी? असा प्रश्न विचारल्यानंतर Chat GPT ने त्याला उत्तर देताना म्हटले की, पृथ्वीवर कोंबडी आधी आली की अंडी, हे कोणालाही माहीत नाही. कारण या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिक किंवा वैदिक तथ्यांवर आधारित नाही. हे एखाद्या निसर्ग किंवा धार्मिक प्रश्नासारखे आहे, ज्याचे कोणतेही वैज्ञानिक किंवा वैश्विक उत्तर उपलब्ध नाही. (Viral News)

Chatgpt Answers on chicken first or egg
Singam 3 Release Date Out: 'सिंघम 3' च्या रिलीज डेटची घोषणा! अजय देवगणसह दीपिकाही दिसणार पोलिसांच्या गणवेशात

उत्तरात पुढे म्हटले की.....

Chat GPT दिलेल्या उत्तरात पुढे म्हटले की, यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. काही लोक आधी अंडी आणि नंतर कोंबडी आली असे मानतात तर काही लोकांचा आधी कोंबडी आली आणि नंतर ती अंडी घालू लागली असा समज आहे. आणखी एक मत असं आहे की अंडी आणि कोंबडी दोन्ही निसर्गाने एकाच वेळी सृष्टीसाठी निर्माण केल्या आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास अंडी आणि कोंबडी हे दोन्ही एक प्रकारचे जीव आहेत आणि त्यांची उत्पादन प्रक्रिया एकत्रितपणे विकसित झाली असावी, असे उत्तर Chat GPT ने दिले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com