नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी नुकत्याच केलेल्या एका उत्कृष्ट कामगिरीबद्दल सध्या त्यांचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. नोएडा येथे एका रुग्णाला किडनीची आवश्यकता होती. त्यासाठी त्याला फरीदाबाद येथील एका खासगी रुग्णालयातून किडनी पाठवण्यात येणार होती. ही किडनी वेळेवर पोहोचावी यासाठी नोएडा पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार करत अवघ्या २५ मिनिटांत ही किडनी पोहोचवून रुग्णाचे प्राण वाचवले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
ग्रेटर नोएडा पश्चिम येथील एका खाजगी रुग्णालयात एका रुग्णाला किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. या रुग्णाचे मूत्रपिंड प्रत्यारोपण बुधवारी होणार होते, परंतु दाता 34 किलोमीटर अंतरावर असलेल्या फरिदाबाद येथील दुसऱ्या एका रुग्णालयात होता. या रुग्णाला नोएडा येथे आणणे शक्य नव्हते. त्यामुळे ही किडनी फरीदाबाद येथून ग्रेटर नोएडाला घेऊन जावई लागणार होती. त्यासाठी किडनी वेळेत पोहोचणे गरजेचे होते. फरीदाबाद ते ग्रेटर नोएडा हा ४६ किलोमीटरचा प्रवास आहे. त्यासाठी ग्रेनो वेस्टच्या रुग्णालय व्यवस्थापनाने गौतम बुद्ध नगर आयुक्तालय पोलिसांची मदत घेतली.
पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वाहतूक पोलिसांना ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर फरीदाबाद ते ग्रेटर नोएडादरम्यान डीएनडी एक्सप्रेसवे मार्गे ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास कॉरिडॉर तयार झाला. अवघ्या 24 मिनिटांत 34 किलोमीटरचे अंतर कापण्यात आले. अशा परिस्थितीत वेळेची बचत करण्याबरोबरच किडनी प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले.
या संपूर्ण ग्रीन कॉरिडॉरचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेन्टचा पाऊस पाडत ट्राफिक पोलिसांचे कौतुक केले आहे. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये असे दिसून येते की नोएडा पोलीस अधिकारी रुग्णवाहिकेला जाऊ देण्यासाठी रस्त्यांवरील वाहतूक थांबवत आहेत आणि त्याच्या मार्गात कोणतेही अडथळे नसल्याची खात्री करून घेत आहेत. वाहतूक पोलीस अधिकारी स्वत: रस्त्यावर उभे राहून रुग्णवाहिकेला मार्गदर्शन करत आहेत. यावेळी किडनी रुग्णालयात वेळेत पोहोचावी यासाठी रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती. याचे सगळ्यांकडून कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.