Land Mafia  Saam Tv
देश विदेश

Property Rule : प्लॉट असणाऱ्यांनो सावधान! १२ वर्षात घर नाही बांधलं तर हातून जाणार जमीन, कठोर कारवाई नेमकी का?

Noida Authority land ownership cancellation news : वर्षानुवर्षे प्लॉटवर तसेच पडून असतील, तर आता त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. १२ वर्षात प्लॉटवर घर बांधले नाही, तर जमिनीची मालकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

Property rule in Noida for vacant plots : अनेकजण गुंतवणुकीसाठी जमिनीची खरेदी करतात, वर्षानुवर्षे तो प्लॉट, जमीन तशीच पडीक असे. किंमत वाढल्यानंतरच ती जमीन विकली जाते अथवा त्यावर इमारत उभारण्यात येते. पण आता १२ वर्षाच्या आतमध्ये त्या प्लॉटवर इमारत, घर बांधावे लागणार आहे, अन्यथा त्या जमिनीची मालकी रद्द करण्यात येणार आहे. नोएडा अथॉरिटीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. ज्याची इमारत बांधण्यास सुरूवात आहे, त्याला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे.

रिकाम्या मालमत्तांचे, जमिनीचे पुनर्वसन करण्यासाठी नोएडा अथॉरिटीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोएडामध्ये प्लॉट खरेदी करून किमत वाढवण्याचा धंदा, बिजनेस पूर्ण बंद होणार आहे. त्याशिवाय अनेक दिवसांपासून बांधकाम सुरू आहे, पण इमारत तयार नाही त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. नोएडा अथॉरिटीने २१९ व्या बोर्ड बैठकीत रिकाम्या जमिनीबाबतचा हा मोठा निर्णय घेतला. त्याशिवाय महत्त्वाच्या विकास कामालाही मंजुरी देण्यात आली. शहरातील वाढती लोकसंख्या अन् घराची संख्या पाहून नोएडा अथॉरिटीने हा निर्णय घेतलाय. नोएडा अथॉरिटीने भविष्यात इतर राज्यातही लागू होऊ शकते.

आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

नोएडा अथॉरिटीच्या नव्या नियमांनुसार, प्लॉट, जमिनीव १२ वर्षांच्या आतमध्ये घर, इमारत बांधली नाही, तर त्याची मालकी हक्क रद्द करण्यात येणार आहे. नियमांच पालन न करणाऱ्यांविरोधात आतापर्यंतची ही सर्वात कठोर कारवाई असल्याचे म्हटले जातेय. नोएडा अथॉरिटीचे सीईओ लोकेश एम म्हणाले, "ज्या प्लॉट, जमिनीवर १२ वर्षांनंतरही घरे बांधली गेली नाहीत अशाची मालकी रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. रिकाम्या भूखंडांमुळे परिसराचे सौंदर्यच बिघडत नाही तर नियमांचेही उल्लंघन होते."

नोएडामध्ये सध्या १७ निवासी प्लॉट हे, त्यांनी १२ वर्षांची मुदत, मर्यादा ओलांडली आहे. या जागेला पूर्णत्व प्रमाणपत्र मिळणार नाही. यामधील ९ प्लॉटमध्ये कोणतेही बांधकाम सुरू नाही, त्यामुळे जमिनीची मालकी रद्द करण्यात येऊ शकते. अथॉरिटीकडून गेल्या वर्षभरापासून प्लॉटधारकांना इशारा अन् सूचना दिल्या जात आहे. नोएडामध्ये ३०,००० प्लॉटपैकी १,५०० प्लॉटवर अर्धवट बांधकाम झालेय. त्यावर एक खोली, एक शौचालय, एक स्वयंपाकघर आणि एक सीमा भिंत आहे. पाणी, वीज याचं कनेक्शन देखील बसवलेले असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karmala Fort History: मुंबईच्या समुद्रकिनारी असलेले जुने गड, करमाळा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

'जरांगेंना AK47 द्या आणि ओबीसींचा खात्मा करा' विजय वडेट्टीवार संतापले

मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला, उपसरपंचाचा मुलगा पाण्यात वाहून गेला, २३ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू

Nagpur Health Crisis : विषारी औषध की मेंदूज्वर? नागपूर आणि मध्यप्रदेशातील बाल मृत्यूमागचं नेमकं कारण आलं समोर

Soft Chapati Tips: पहिल्यांदा चपाती करताय? मग सॉफ्ट चपातीसाठी ही टिप नक्की वापरुन पाहा

SCROLL FOR NEXT