nobel prize in medicine 2024 winner victor ambros and gary ruvkun : व्हिक्टर अॅम्ब्रोस, गॅरी रवकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर एएफपी
देश विदेश

Nobel Prize In Physiology : अॅम्ब्रोस-गॅरी रवकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार; संशोधन आणि पुरस्काराची रक्कम किती?

Saam Tv

Nobel Prize In Physiology 2024 Latest News : अमेरिकी शास्त्रज्ञ व्हिक्टर अॅम्ब्रोस (Victor Ambros) आणि गॅरी रवकुन (Gary Ruvkun) यांना वैद्यकशास्त्रातील (औषध आणि शरीरशास्त्र) नोबेल पुरस्कार २०२४ जाहीर झाले आहेत. 'मायक्रो आरएनए'चा शोध आणि पोस्ट ट्रान्सस्क्रिप्शनल जीन रेग्युलेशनमध्ये त्याचे महत्वपूर्ण योगदान यासाठी अॅम्ब्रोस आणि रवकुन यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणेच वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा सर्वात आधी करण्यात येते. सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांच्या पाच विभागातील विजेते शास्त्रज्ज्ञ, तज्ज्ञ, साहित्यिक- विचारवंतांची नावे येणाऱ्या काही दिवसांत घोषित करण्यात येतील. स्वीडनच्या करोलिंस्का इन्स्टिट्युट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या नोबेल अॅसेम्बलीकडून वैद्यकशास्त्रातील विजेत्यांची नावे निवडली जातात. विजेत्यांना ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच जवळपास ८.९१ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येते.

अॅम्ब्रोस आणि रवकुन यांचं योगदान

नोबेल अॅसेम्बलीच्या माहितीनुसार, अॅम्ब्रोस आणि रवकुन यांनी मायक्रो आरएनए (microRNA) चा शोध लावला. त्याची जैव विकास आणि कार्यपद्धतीत अत्यंत मोलाची अशी भूमिका आहे. अॅम्ब्रोस यांच्या संशोधनामुळं त्यांना हॉर्वर्ड विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला. ते सध्या मेसाचुसेट्स मेडिकल स्कूल विश्वविद्यालयात नैसर्गिक विज्ञान विषयाचे प्राध्यापक आहेत.

रुवकुन यांनी मॅसाचुसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये संशोधन केलं. त्या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, असे नोबेल समितीचे महासचिव थॉमस पर्लमॅन यांनी सांगितले.

मागील वर्षी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize in Medicine) कॅटालिन कारिको आणि ड्रू व्हिजमॅन यांना देण्यात आला होता. त्यांनी कोविड १९ (Covid 19) प्रतिबंधात्मक एमआरएनए लस विकसित करण्यास त्यांच्या संशोधनाची मदत झाली. जीवघेण्या कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी करण्यात त्यांच्या या संशोधनानं महत्वाची भूमिका बजावली होती.

वैद्यकशास्त्रात आतापर्यंत २२७ विजेत्यांना नोबेल

वैद्यकशास्त्रात आतापर्यंत एकूण २२७ विजेत्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात फक्त १३ महिला शास्त्रज्ञांनाच हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या शास्त्रज्ञांना जवळपास १० लाख अमेरिकी डॉलर इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाते. स्वीडनचे शास्त्रज्ज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: पंखा थांबवून लड्डू मुत्त्या बाबाचा भक्तांना आशीर्वाद? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटलांनी तुतारी फुंकली, भरणेंचं टेंशन वाढलं; आमदार झाले तर पाटलांचं मंत्रिपद पक्क? VIDEO

Prashant Paricharak: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी, प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार?

Rohit Sharma: रोहित कसोटी क्रिकेटला रामराम करणार? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा

Maharashtra Politics : मंत्रालयातील मेगाभरतीची घोषणा हवेतच; किती कर्मचाऱ्यांची आहे कमतरता? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT