दररोज लाखो वाहने भारतातील रस्त्यांवर धावत असतात. महामार्गांवर असंख्य टोल प्लाझा असून, सर्व वाहनांना टोल भरावा लागतो. सध्या देशभरात अंदाज १,०६५ टोल प्लाझा आहेत. यातून दरवर्षी हजारो कोटी रूपयांचे उत्पन्न तयार होते. मात्र, काही विशिष्ट नियमांनुसार, काही व्यक्तींना टोल भरण्यापासून सूट देण्यात येते. विशेषत: टोल प्लाझाच्या जवळ राहणाऱ्यांना ही सूट लागू होते. तुमचे घर टोल प्लाझापासून किती अंतरावर असेल तर, तुम्हाला टोल भरण्याची गरज नाही. याबाबतचे नियम काय सांगतात, हे जाणून घ्या.
टोल प्लाझापासून किती अंतरावर राहिल्यास टोल भरावा लागत नाही?
जर तुमचे घर टोल प्लाझापासून २० किमीच्या परिसरात असेल, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोलमधून सूट मिळते. यासाठी आपल्याला निवासस्थानाचा पुरावा म्हणून अधिकृत कागदपत्र सादर करावे लागते. २४ सप्टेंबर २०२४ पासून लागू झालेल्या 'जितनी दूरी उतना टोल', या धोरणांतर्गत जीएनएसएस प्रणालीद्वारे ट्रॅक केलेल्या वाहनांना २० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी टोल सूट लागू केली आहे.
सरकारी वाहनांनाही टोलमध्ये सूट
टोल प्लाझाच्या २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना टोलमधून सूट आहे. या व्यक्तींव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकृत वाहनांना, जसे की पोलीस वाहने, रूग्णावाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही टोलमधून सूट आहे. तसेच भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वाहनांनाही टोलमधून सूट आहे. शिवाय, एनडीआरएफच्या वाहनांनाही टोलमधून सूट आहे.
दुचाकीस्वारांनाही टोलमधून सूट
फक्त सरकारी वाहनांनाच नव्हे, तर दुचाकी वाहनांना देखील टोलमधून सूट आहे. कारण दुचाकी वाहने हलकी असतात, तसेच रस्त्यांवर कमी भार टाकतात. त्यामुळे दुचाकीसाठी FASTagची आवश्यकता नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.