

तुमच्या घरात उंदीर आणि पाळींचा सुळसुळाट आहे का? उंदीर घरी असल्यावर अनेकांना भिती वाटते. किचनमध्ये उंदीर फिरल्यावर घरात रोगराई पसरते. पण घरातून उंदिर पळवून लावणं खरंतर अवघड काम. उंदिर घरातून घालवण्यासाठी आपण अनेक आयडिया फॉलो करून पाहतो. पण घरातून उंदिर पळ काढतीलच असं नाही. उंदिर पळवून लावण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. घरातून उंदीर पळवून लावण्यासाठी हे घरगुती उपाय निश्चितच उपयुक्त ठरतील.
उंदीर पळवून लावण्यासाठी बाजारात बरेच औषधे उपलब्ध आहेत. मात्र, केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर न करता आपण घरगुती उपायांनीही उंदीर पळवून लावू शकता. उंदीर तीव्र वास आणि विशिष्ट पदार्थांपासून घाबरतात.
पुदिना
उंदीर पुदिन्याचा तीव्र गंध सहन करू शकत नाही. उंदीर मारण्यासाठी हा सर्वात प्रभावी घरगुती उपाय आहे. कापसाला पुदिना अन् पेपरमिंटच्या तेलाचे काही थेंब लावा. तसेच उंदीर येणाऱ्या ठिकाणी कापसाचे गोळे ठेवा. उंदीर पळ काढतील.
लाल तिखट
उंदीर मिरचीचा तिखट गंध आणि तिखटपणा सहन करू शकत नाहीत. यासाठी उंदीर येणाऱ्या ठिकाणी लाल मिरची पावडर शिंपडा. या उपायामुळे घरात उंदीर पुन्हा फिरकणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.