Latest NMC guidelines for medical advertising in India AI Image
देश विदेश

NMC Guidelines : डॉक्टरांसाठी नव्या गाईडलाईन, NMC चा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

NMC Guidelines Medical Advertising : NMC च्या वैद्यकीय जाहिरातींसंबंधी नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णालयांना आता खोट्या जाहिराती बनवता येणार नाहीत.

Alisha Khedekar

  • डॉक्टर आणि रुग्णालयांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीची विश्वासार्हता महत्त्वाची

  • NMC कडून नवीन नियमावली जरी

  • AI बनावट रिव्ह्यू देता येणार नाही

  • बिफोर-अँड-आफ्टर फोटो दाखवून बढाई करता येणार नाही

सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रुग्णांना आकर्षित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींवर आता अधिक लक्ष ठेवले जाणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ने डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी नव्या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे वैद्यकीय जाहिरातींमधील पारदर्शकतेवर भर दिला आहे. रुग्णांची दिशाभूल रोखण्यासाठी हा नियम काढण्यात आल्याचं म्हटले जात आहे.

AI च्या मदतीने खोटे रिव्ह्यू

नवीन नियमांनुसार, डॉक्टर आणि रुग्णालयांना AI चा वापर करून बनावट रुग्ण रिव्ह्यू, कौतुक करणारे सर्टिफिकेट किंवा जाहिरात तयार करता येणार नाही. अशा खोट्या रिव्ह्यूमुळे रुग्णांची दिशाभूल होऊ शकते. तसेच डॉक्टर किंवा रुग्णालयाच्या प्रत्यक्ष सेवांबाबत चुकीची प्रतिमा निर्माण होण्याची शक्यता असते.

‘आफ्टर आणि बिफोर' चे फोटो

कॉस्मेटिक सर्जरी, हेअर ट्रान्सप्लांट आणि इतर वैद्यकीय प्रक्रियांच्या जाहिरातींमध्ये उपचारांपूर्वीचे आणि उपचारांनंतरचे फोटो मोठ्या प्रमाणात वापरले जातात. हे फोटो वापरून रुग्णांना आपला चांगला दर्जा दाखवला जातो आणि रुग्ण त्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे दिशाभूल करणारे ‘बिफोर-अँड-आफ्टर’ फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याबाबत डॉक्टर आणि हॉस्पिटलने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

खोटे दावे करता येणार नाही

कोणत्याही आजारावरील उपचार हमखास यशस्वी होतील, १०० टक्के परिणाम मिळतील किंवा चमत्कारिकरीत्या रोग बरा होईल, अशा प्रकारचे दावे करून जाहिरात करता येणार नाही. प्रत्येक रुग्णाची प्रकृती, आजाराची तीव्रता आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद वेगवेगळा असतो. त्यामुळे अशा हमी देणाऱ्या जाहिराती अयोग्य ठरू शकतात.

सोशल मीडिया पोस्ट

हे नियम केवळ होर्डिंग्ससारख्या जाहिरातींपुरते मर्यादित नसून इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांसारख्या डिजिटल माध्यमांना देखील लागू होतात. डॉक्टरांनी सोशल मीडियावर माहिती देताना ती तथ्यांवर आधारित असल्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचं या नियमांमध्ये सांगण्यात आले आहे. या नव्या नियमांमुळे रुग्णांना चांगल्या हॉस्पिटल किंवा डॉक्टरची निवड करता येणार आहे. आकर्षक जाहिराती किंवा बनावट रिव्ह्यूवर विश्वास ठेवण्याऐवजी पात्र डॉक्टरांचा सल्ला आणि उपचारांशी संबंधित योग्य माहितीच्या आधारे निर्णय घेणे रुग्णांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात नेमकं काय होतं? थक्क करणारा दावा

Maharashtra News Live Update: एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, भाडेवाढ होणार नाही; परिवहन मंत्र्यांची माहिती

Night Leg Cramps : रात्री झोपेत अचानक पायात गोळा येतोय? 'या' गंभीर आजाराचे आहे संकेत

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोडी! खासदार सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मोठा निर्णय होणार?

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला ६० व्या वर्षी व्हायचे 'बाबा'; खुलासा करत म्हणाला - "मला मुलांची..."

SCROLL FOR NEXT