नितीश कुमार यांच्या जेडीयूची पंजाबमध्ये अकाली दलासोबत युती
पंजाब विधानसभा निवडणुकीआधी जेडीयूची नवी राजकीय आघाडी
नितीश कुमारांचा पंजाबमध्ये नवा राजकीय डाव
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं होतं. नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणाऱ्या एनडीएनं विजय मिळवला. राज्यात एनडीएची सत्ता आली नितीश कुमार मुख्यमंत्री बनले, परंतु काहीच दिवसात त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागी भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारच्या राजगादी सम्राट बसले असले तरी बिहारमध्ये आलबेल नाहीये. नितीश कुमारांना बाजुला केल्यानं जेडीयूमध्ये नाराजीचा सूर सुरू आहे. पण राज्यात सर्व काही ठिक असल्याचं दाखवलं जातंय. त्याचदरम्यान आता नितीश कुमार यांनी एक नवा राजकीय डाव खेळत पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का दिला. जेडीयूनं पंजाबमध्ये वेगळा मार्ग निवडत दुसऱ्याच पक्षाशी युती केलीय.
नितीश कुमार यांच्या जागी सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री बनवल्यामुळे जेडीयू नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बिहारमध्ये समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या मुद्द्यावर देखील नितीश कुमार यांच्या पक्षाने वेगळी भूमिका मांडली. आता पंजाबमध्ये जेडीयूनं भाजपसोबतीची युती तोडलीय. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी 2027 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीची तयारी जेडीयूने आतापासूनच सुरू केलीय. त्याचदरम्यान नितीश कुमार यांच्या पक्षाने मोठा निर्णय घेतलाय.
पंजाबमध्ये जेडीयूने भाजपसोबत युती न करता थेट शिरोमणी अकाली दल श्री आनंदपूर साहिब (एसएडीएसएएस) सोबत युती केलीय. जेडीयू हा एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहे. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं सरकार आहे. परंतु पंजाबमध्ये मात्र जेडीयूने भाजपची सोथ सोडलीय. त्यामुळे आता नितीश कुमार यांची पुढची वाटचाल कशी असणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे सुनील दत्त यांची पुतणी आणि संजय दत्त यांची चुलत बहीण ममता दत्त यांनी देखील जेडीयूमध्ये प्रवेश केलाय. एसएडीएसएएस आणि जेडीयूची युती झाली आहे. ते पंजाब विधानसभेच्या सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. समविचारी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी आम्ही युती केली असल्याची माहिती यावेळी जेडीयूचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष मलविंदर सिंह बेनीपाल यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.