Nirmala Sitharaman in Lok Sabha SAAM TV
देश विदेश

No Confidence Motion Debate : निर्मला सीतारामन यांनी एकहाती लढवला किल्ला; काँग्रेसवर तुटून पडल्या

nirmala sitharaman On No Confidence Motion Debate : काँग्रेस पक्ष स्वप्न दाखवतो, पण भाजप ते प्रत्यक्षात साकार करतो. तुमच्यात आणि आमच्यात नेमका हाच फरक आहे, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

Nandkumar Joshi

Nirmala Sitharaman On No Confidence Motion Debate : केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (१० ऑगस्ट) काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस पक्ष स्वप्न दाखवतो, पण भाजप ते प्रत्यक्षात साकार करतो. तुमच्यात आणि आमच्यात नेमका हाच फरक आहे, असं त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)

निर्मला सीतारामन म्हणाल्या, '२०१३ मध्ये मॉर्गन स्टेनली या कंपनीने भारताचा जगातील सर्वात नाजूक अर्थव्यवस्थांच्या यादीत समावेश केला होता. ज्या कंपनीने भारतीय अर्थव्यवस्था नाजूक असल्याचे घोषित केले होते, आज त्यांनीच भारताला अपग्रेड करून सर्वोच्च रेटिंग दिली आहे. फक्त ९ वर्षांत आमच्या सरकारच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेने झेप घेतली आहे. कोविड संकट येऊनही आर्थिक विकास झाला. आजघडीला भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.'

भारत आपल्या भविष्याच्या विकासाबाबत आशावादी आणि सकारात्मक आहे. भारताला प्रगतीपथावर जाण्यापासून कुणी रोखू शकत नाही. होईल, मिळेल हे शब्द आता व्यवहारातून बाहेर गेले आहेत. आताच्या घडीला लोक झालं, मिळालं आणि आलं या शब्दांचा वापर अधिक करताना दिसत आहेत, असं सांगताना सीतारामन यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

यूपीएच्या कार्यकाळात लोक वीज येईल, असे लोक म्हणायचे. पण आता वीज आली असं म्हणू लागले आहेत. तेव्हा गॅस कनेक्शन मिळेल असे म्हणायचे, पण आता गॅस कनेक्शन मिळालं असे लोक म्हणतात. आमच्यात आणि काँग्रेसमध्ये हाच फरक आहे. ते स्वप्न दाखवतात आणि भाजप स्वप्न पूर्ण करतो, असं सीतारामन म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT