Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींवरील आरोपांना काँग्रेसचं जशास तसे उत्तर; भाजप नेत्याचा फ्लाइंग किसचा व्हिडिओ केला शेअर

Rahul Gandhi Flying Kiss alleged by BJP MP : राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केल्यानंतर सभागृहातून जाताना भाजप खासदारांना 'फ्लाइंग किस' दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला.
Rahul Gandhi Flying Kiss allegations
Rahul Gandhi Flying Kiss allegations SAAM TV
Published On

Rahul Gandhi Flying Kiss alleged by BJP MP : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केल्यानंतर सभागृहातून जाताना भाजप खासदारांना 'फ्लाइंग किस' दिल्याचा आरोप भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केल्यानंतर मोठा गदारोळ झाला आहे. भाजपच्या आरोपांना काँग्रेसनं व्हिडिओनेच उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे नॅशनल मीडिया पॅनलिस्ट सुरेंद्र राजपूत यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काल, बुधवारी संसदेत मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना भाषण केले. त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. राहुल पुन्हा वादात सापडले आहेत. राहुल यांनी सभागृहातून निघताना भाजप खासदारांना फ्लाइंग किस दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला.

Rahul Gandhi Flying Kiss allegations
Rahul Gandhi Speech: रावण दोघांचं ऐकायचा; तसेच मोदीही... राहुल गांधी संसदेत तुफान बरसले; वाचा भाषणातील ५ प्रमुख मुद्दे

इराणी यांच्या आरोपांना काँग्रेस (Congress) नेते आणि पक्षाचे नॅशनल मीडिया पॅनलिस्ट सुरेंद्र राजपूत यांनी उत्तर देत जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यात शिवराजसिंह हे कॅमेऱ्यासमोर फ्लाइंग किस करताना दिसत आहेत. राजपूत यांनी हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये स्मृती इराणींना टॅग केलं आहे. हा आहे शिवराजसिंह चौहान यांचा फ्लाइंग किस असं त्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

व्हिडिओ येथे पाहा :

Rahul Gandhi Flying Kiss allegations
Rahul Gandhi Speech: राहुल गांधींनी सांगितले मणिपूरच्या छावण्यांमधील २ भयंकर अनुभव; ऐकून संसदेत सन्नाटा, पाहा VIDEO

सुरेंद्र राजपूत यांनी स्मृती इराणींवर टीकास्त्र सोडताना एकापाठोपाठ एक ट्विट केलं आहे. पात्रता नसतानाही उच्चपदावर बसलेल्या काही लोकांचा खोटेपणा हा दागिना झाला आहे. असे लोक आपल्या फायद्यासाठी कुणाचंही चारित्र्यहनन करण्यास तत्पर असतात, असे राजपूत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसभेत नेमकं काय झालं?

राहुल गांधी यांनी सभागृहातील भाषण संपवून बाहेर जात असताना, त्यांच्याकडील काही कागदपत्रे हातातून खाली पडली. ती उचलण्यासाठी राहुल खाली वाकले. त्यावर भाजप नेते हसले. त्यावर राहुल यांनी ट्रेझरी बेंचकडे बघून फ्लाइंग किस दिला आणि हसत हसत निघून गेले. त्याचवेळी स्मृती इराणींचं सभागृहात भाषण करत होत्या. भाजप खासदारांकडे बघून फ्लाइंग किस दिल्याचा आरोप त्यांनी राहुल गांधींवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com