Rahul Gandhi Speech: राहुल गांधींनी सांगितले मणिपूरच्या छावण्यांमधील २ भयंकर अनुभव; ऐकून संसदेत सन्नाटा, पाहा VIDEO

Rahul Gandhi in LokSabha 2023: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज सभागृहात अविश्वास प्रस्तावावर आषण केलं. आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
Rahul Gandhi Speech Manipur Violence Lok Sabha No Confidence Motion 2023 PM Narendra Modi
Rahul Gandhi Speech Manipur Violence Lok Sabha No Confidence Motion 2023 PM Narendra ModiSaam TV
Published On

Rahul Gandhi in LokSabha 2023: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. यावर लोकसभेत चर्चा सुरू असून या चर्चेचा आज दुसरा दिवस आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज सभागृहात अविश्वास प्रस्तावावर भाषण केलं. आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याशिवाय मणिपूरमधील छावण्यांमधील २ भयंकर अनुभव देखील सांगितले.

Rahul Gandhi Speech Manipur Violence Lok Sabha No Confidence Motion 2023 PM Narendra Modi
Avishwas Prastav 2023: काँग्रेस खासदाराचे PM मोदींना 3 महत्वाचे प्रश्न अन् सत्ताधाऱ्यांमध्ये सन्नाटा; लोकसभेत नेमकं काय घडलं?

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो, आपले पंतप्रधान मोदी अजून गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हिंदुस्तान नाहीये. मणिपूरमध्ये रीलिफ कँम्पमध्ये मी काही महिलांची भेट घेतली. त्यात एका महिलेने सांगितलं माझं एकच मुलं होतं".

"माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी मारली. मी पूर्ण रात्र मी त्या मृतदेहासोबत घालवली. मी फक्त कपडे सोबत घेऊन घर सोडलं. त्या महिलेनं एक फोटो काढून दाखवला आणि फक्त एवढंच माझ्यासोबत आहे", असं त्या महिलेनं सांगितलं असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी सांगितलेला दुसरा प्रसंग

दुसऱ्या अनुभवाबद्दल सांगताना राहुल गांधी म्हणाले, "मी एका महिलेला तुमच्यासोबत काय झालं असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच माझ्या समोर ती महिलेला ती थरथरायला लागली. तिच्या समोर ते दृश्य उभं राहिलं आणि ती महिला बेशुद्ध पडली, यांनी मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली आहे", असं म्हणत राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, राहुल गांधी यांचं भाषण सुरू होताच, सत्ताधाऱ्यांनी संसदेत मोदी-मोदी नावाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्यांनी सांगितलेले दोन भयंकर अनुभव ऐकून संसदेत काही काळ सन्नाटा पसरला होता.

दुसरीकडे राहुल गांधी यांच्या भाषणावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी राहुल गांधी म्हणजे भारत नाही, असं म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी काश्मीरचा मुद्दा देखील उपस्थित केला. काश्मीरमध्ये पंडितांची हत्या झाली. त्यावेळी काँग्रेसने आवाज का उठवला नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला. काँग्रेस काश्मीरमधील कलम 370 परत आणेल, असंही स्मृती इराणी म्हणाल्या.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com