Amit Shah News: गृहमंत्री अमित शहांचा तो दावा निघाला खोटा! कलावती बांदुरकरांनी सांगूनच टाकलं; 'राहुल गांधींमुळेचं आयुष्य...'

Kalavati Bandurkar On Amit Shah: गृहमंत्री अमित शहा यांनी कलावती बांदूरकर यांना मदत केल्याचे सांगितले होते. हे सर्व दावे खोटे निघाले आहेत.
Amit Shah Klavati Bandurkar Rahul Gandhi:
Amit Shah Klavati Bandurkar Rahul Gandhi: Saamtv
Published On

No Confidence Motion in Parliament: मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. काल संसदेत या प्रस्तावाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना यवतमाळ जिल्ह्यातील विधवा कलावती बांदूरकर यांना मदत केल्याचे सांगितले होते. मात्र कलावती बांदुरकर यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

Amit Shah Klavati Bandurkar Rahul Gandhi:
Cheteshwar Pujara Bday: घरी गरिबी, आईने कर्ज काढून दिली होती बॅट, असा घडला Team India चा नवा 'द वॉल'

याबाबत अधिक माहिती अशी की, संसदेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला. बुंदेलखंडातील कलावती यांच्या घरी भेट देऊन त्यांनी संसदेत गरिबीची करुण कहाणी सांगितली. नंतर त्यांना कुठलीही मदत केली नाही, असा आरोप शहांनी केला.

पण, राहुल हे बुंदेलखंडातील कुठल्याही कलावतीला भेटले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदुरकर यांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी कलावतींच्या समस्या सोडविल्याचे स्पष्टिकर आता कॉंग्रेसने (Congress) दिले आहे. तसेच बुंदेलखंडातील नव्हेतर यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील जळका येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदुरकर यांच्या घरी राहुल यांनी भेट दिली होती.

Amit Shah Klavati Bandurkar Rahul Gandhi:
Bhiwandi Wada Manor Highway : खड्डे बुजवा, लाेकांचा जीव वाचवा; भिवंडी- वाडा- मनोर महामार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको

यानंतर कलावती या प्रकाशझोतात आल्या. त्यांना भरीव मदत करण्यात आली. याबद्दल स्वतः कलावंती बांदुरकर यांनी "राहुल गांधी यांच्यामुळे मुळेच मला सन्मानाने जगता आले. त्याच काँग्रेसने मला सगळ्यात सुख सुविधा पुरविल्या आहे. मोदी सरकारने मला काहीही दिलं नाही. संसदेत जे कुणी बोलले ते खोटं बोलले.." असे स्पष्टिकरण दिले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com