Gangappa Pujari
राहुल द्रविडनंतर टीम इंडियाची नवा द ऑल म्हणून ओळखळा जाणारा खेळाडू म्हणजेच चेतेश्वर पुजारा...
आज (२५ जानेवारी) चेतेश्वर पुजाराचा वाढदिवस, पुजाराचा जन्म 25 जानेवारी 1988 रोजी झाला...
पुजाराला हा खेळ वारश्याने मिळाला आहे.
त्याचे आजोबा शिवपाल पुजारा उत्कृष्ट लेग-स्पिनर होते, तर वडील अरविंद आणि काका विपिन सौराष्ट्रकडून रणजी खेळले आहेत...
मात्र, पुजाराला महान फलंदाज बनवण्यात त्याच्या आईची विशेष भूमिका आहे. मात्र दुर्देवाने त्या आपल्या मुलाला टीम इंडियाकडून खेळताना पाहू शकल्या नाहीत...
जेव्हा चेतेश्वर पुजाराला त्याची पहिली बॅट खरेदी करायची होती तेव्हा त्याच्या आईकडे पैसेही नव्हते.
गरिब परिस्थितीमुळे पुजाराच्या आईने आपल्या मुलाला कर्जावर बॅट मिळवून दिली आणि हप्त्याने पैसे परत केले. इतकेच नव्हेतर, पुजाराला लहान वयात बॅटिंग पॅड्स बसत नव्हते म्हणून आईने स्वतःच्या हाताने आपल्या मुलासाठी पॅड शिवले.
संथ खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2019 मध्ये फक्त 61 चेंडूत शतकही झळकावले आहे.
2010 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या पुजाराने आतापर्यंत 98 कसोटी सामन्यांमध्ये 44.44 च्या सरासरीने 7014 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने 19 शतके आणि 34 अर्धशतकेही केली आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्येही तीन द्विशतके आहेत.