NIA Raid Saam Tv
देश विदेश

NIA Raid: NIA ची मोठी कारवाई, देशातील 6 राज्यांमध्ये 100 ठिकाणी छापेमारी

Latest News: देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर रोखण्यासाठी एनआयएची ही कारवाई सुरु आहे.

Priya More

Delhi News: राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) देशातील सहा राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकले जात आहेत.

एनआयएने बुधवारी दहशतवाद, अंमली पदार्थ तस्कर आणि गँगस्टरांविरोधात मोठी कारवाई केली. एनआयएने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांमधील 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. शिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानीच्या साथीदार असलेल्या परिसरात एनआयएकडून झडती घेण्यात येत आहे.

लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीतील सदस्यांना आणि अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या सिंडिकेटला तोडण्यासाठी एनआयएकडून हा छापा टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या छाप्यात एनआयएने 70 हून अधिक मोबाईल जप्त केले होते. या मोबाईलमध्ये ड्रग नेक्सस आणि लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीशी संबंधित लोकांची अनेक गुपिते समोर आली होती.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात बसलेले गुंड खलिस्तानी फुटीरतावाद्यांना निधी देऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. 100 पेक्षा अधिक ठिकाणी छाप्यांमध्ये एनआयए टीमचे 200 हून अधिक सदस्य सहभागी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. जसविंदर सिंग मुलतानी हा SFJ संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूचा जवळचा सहकारी असल्याचे मानले जाते आणि तो फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT